Central Railway  Yandex
मुंबई/पुणे

Central Railway Mega Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर ५ दिवस मेगा ब्लॉक

Central Railway Mega Block: मध्य रेल्वे, मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मस्जिद स्थानकांदरम्यान कार्नॅक आरओबीच्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्स लाँच करण्याचे काम हाती घेतले आहे.

Dhanshri Shintre

दिनांक २५-२६ जानेवारी, दि. २६-२७ जानेवारी, दि. ३१ जानेवारी/ दि. १ फेब्रुवारी, दि. १-२ फेब्रुवारी आणि दि. २-३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मस्जिद दरम्यान कर्नाक आरओबी (दुसरा स्पॅन) पुनर्बांधणीसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याक येणार आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मस्जिद स्थानकांदरम्यान कार्नॅक आरओबी (स्पॅन-२) च्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्स लाँच करण्याचे काम हाती घेतले आहे.

खालील दिनांक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विभागात किमी ०/१-२ वर

ब्लॉक १ - २५-२६ जानेवारीच्या मध्यरात्री

ब्लॉक २ - २६-२७ जानेवारीच्या मध्यरात्री

ब्लॉक ३ - ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री

ब्लॉक ४ - १-२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री

ब्लॉक ५ - २-३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री

ब्लॉक खालीलप्रमाणे परिचालीत केले जातील:

ब्लॉक - १

ब्लॉक दिनांक: २५ आणि २६ जानेवारी (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)

ब्लॉक कालावधी: ११.३० वाजता ते ०५.३० वाजता (६ तास)

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम:

* ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

* मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा या स्थानकांवर शॉर्ट ओरिगीनेट होतील.

* हार्बर लाईनवरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट ऑरिगजिनेट.

मेन लाईनवरील ब्लॉकच्या आधीच्या शेवटच्या लोकलचा तपशील:

डाऊन धीम्या् मार्गावर- टिटवाळा- सीएसएमटी येथून १०.५० वाजता सुटेल आणि टिटवाळा येथे १२.३३ वाजता पोहोचेल. डाउन जलद मार्गावर-कसारा- सीएसएमटी येथून १०.४७ वाजता सुटेल आणि कसारा येथे ०१.१२ वाजता पोहचेल. अप धीम्या मार्गावर- कल्याण येथून ०९.१६ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १०.४५ वाजता पोहचेल. अप जलद लाईनवर- कल्याण येथून १०.०२ वाजता सुटेल आणि ११.०४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

मेन लाईनवरील ब्लॉक नंतरच्या पहिल्या लोकलचा तपशील:

डाऊन धीम्या मार्गावर-अंबरनाथ- सीएसएमटी येथून ०५.४० वाजता सुटेल आणि अंबरनाथ येथे ०७.२३ वाजता पोहोचेल. डाउन जलद मार्गावर-कर्जत- सीएसएमटी येथून ०५.४६ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०७.४३ वाजता पोहोचेल. अप धीम्या मार्गावर- ठाणे येथून ०४.४८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.४६ वाजता पोहोचेल. अप जलद लाईनवर- ठाणे येथून ०५.०८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.५२ वाजता पोहोचेल.

हार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकलची माहिती:

पनवेलसाठी डाउन मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.५८ वाजता सुटेल आणि पनवेल येथे १२.१८ वाजता पोहोचेल. गोरेगावसाठी डाउन मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.५४ वाजता सुटेल आणि गोरेगाव येथे ११.४९ वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप मार्गावर - पनवेल येथून ०९.३९ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १०.५८ वाजता पोहचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप मार्गावर - वांद्रे टर्मिनस येथून १०.२४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १०.५४ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरच्या पहिल्या लोकलची माहिती:

डाउन मार्गावर - पनवेलसाठी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०६.०० वाजता सुटेल आणि ०७.२० वाजता पनवेल येथे पोहोचेल. डाउन मार्गावर - गोरेगावसाठी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०५.५० वाजता सुटेल, गोरेगाव येथे ०६.४४ वाजता पोहोचेल. अप मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून साठी - बेलापूर येथून ०४.५३ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून येथे ०५.५६ वाजता पोहोचेल. अप मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी - गोरेगाव येथून ०५.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०६.०० वाजता पोहोचेल.

दादर येथे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचा शॉर्ट टर्मिनेशन:

१. 12870 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २४-०१-२०२५

२. 12052 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५

३. 11058 अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २४-०१-२०२५

४. 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५

५. 11020 भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २४-०१-२०२५

६. 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २४-०१-२०२५

७. 12134 मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५

८. 12702 हैदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५

९. 11402 बल्हारशाह-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५

९. 22158 एमजीआर चेन्नई सेंट्रल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५

१०. 12112 अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५

दादर येथून शॉर्ट ऑरिगजिनेट मेल/एक्सप्रेस गाड्यांचे संक्षिप्त वर्णन:

१. 11057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अमृतसर एक्सप्रेस दि. २५.०१.२०२५ रोजी २३.४८ वा.

२. 22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी एक्सप्रेस दि. २६.०१.२० रोजी २५ ००.३० वा.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून खालील गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने सुटतील.

१. 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव एक्सप्रेस दि. २६-०१-२०२५

२. 22229 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस दि. २६-०१-२०२५

३. 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस दि. २६-०१-२०२५

४. 22105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे एक्सप्रेस दि. २६-०१-२०२५

५. 22119 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्सप्रेस दि. २६-०१-२०२५

गाड्यांचे नियमन

१. 11140 हॉस्पेट-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५ रोजी ४० मिनिटे नियमित केली जाईल.

२. 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५ रोजीची ही गाडी ३० मिनिटांनी नियमित केली जाईल.

ब्लॉक - २

ब्लॉक दिनांक: २६ आणि २७ (रविवार/सोमवार रात्री)

ब्लॉक कालावधी: १२.३० तास ते ०३.३० तास (३ तास)

वाहतूक ब्लॉक विभाग:

भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर (दोन्ही स्टेशन वगळून)

अप आणि डाउन हार्बर मार्गावर - वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान (दोन्ही स्थानके वगळून)

रेल्वे वाहतुकीवरील विपरीत परिणाम

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे परिचालन :

* ब्लॉक काळात मेन लाईनवरील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान आणि हार्बर लाईनवरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

* मेन लाईनवरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/ ऑरिगजिनेट होतील.

* हार्बर लाईनवरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्टेशनवर बंद होतील/उभारल्या जातील.

मुख्य मार्गावरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकलची माहिती:

कर्जतसाठी डाऊन धीम्या मार्गावर - सीएसएमटीहून १२.१२ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०२.३३ वाजता पोहोचेल. अप धीम्या मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी - डोंबिवली येथून १०.४८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १२.१० वाजता पोहोचेल.

मुख्य मार्गावरील ब्लॉकनंतरच्या पहिल्या लोकलची माहिती:

डाऊन धीम्या मार्गावर - कर्जतसाठी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.४७ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०७.०८ वाजता पोहोचेल. अप धीम्या मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी - कल्याण येथून ०३.२३ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.५६ वाजता पोहोचेल.

हार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकलची माहिती:

पनवेलसाठी डाउन मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.१३ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०१.३३ वाजता पोहोचेल. अप लाईनवर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी - पनवेल येथून १०.४६ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १२.०५ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरच्या पहिल्या लोकलची माहिती:

डाउन लाईन - पनवेलसाठी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.५२ वाजता निघून पनवेल येथे ०६.१२ वाजता पोहचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप मार्गावर - वांद्रे टर्मिनस येथून ०४.१७ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.४८ वाजता पोहचेल.

दादर येथे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचा शॉर्ट टर्मिनेशन:

१. 12052 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २६-०१-२०२५

२. 11058 अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २५-०१-२०२५

३. 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस दि. २६-०१-२०२५

ब्लॉक क्रमांक ३, ४ आणि ५ ची माहिती

ब्लॉक ३ - ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारीची मध्यरात्री

ब्लॉक ४ - १-२ फेब्रुवारीची मध्यरात्री

ब्लॉक ५ - २-३ फेब्रुवारीची मध्यरात्री

ब्लॉक क्रमांक ३, ४ आणि ५ चा कालावधी: दुपारी १.३० ते दुपारी ३.३० (२ तास)

वाहतूक ब्लॉक विभाग:

भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर (दोन्ही स्टेशन वगळून)

अप आणि डाउन हार्बर मार्गावर - वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान (दोन्ही स्थानके वगळून)

हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळाणार कोट्यावधींचे बक्षीस

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Accident: नामकरण सोहळ्यावरून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT