
एका दिवसापूर्वी दुचाकीवरून झालेल्या वादात एक तरुणी रस्त्यावरून घरी जात असताना, दुचाकीच्याच चालकाने तिला अडवले. रस्त्यात सुरू असलेल्या वादात अचानक कारने हस्तक्षेप केला. त्यानंतर, कारचालक आणि तरुणी यांच्यात वाद झाला आणि तो वाद मारहाणीत रूपांतरित झाला. कारचालक दामपात्याने तरुणीला जबर मारहाण केली, ज्यामुळे ती खाली पडली आणि तिच्या नाकाला मार लागला. या घटनेचा व्हिडीओ स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रामनगर पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला असून त्याला अटक केली आहे. तथापि, न्यायालयाने आरोपीला जामीन दिला आहे. या घटनेत पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात असून, काही लोकांचे म्हणणे आहे की तपासात योग्य ती पारदर्शकता नसल्यामुळे त्यावर शंका व्यक्त केली जात आहे.
वर्धा येथील सुदर्शन नगरातील २६ वर्षीय रुचीका वसंतराव ठाकरे आपल्या मोटारसायकलवर घरी जात असताना, बुरांडे ले आडट येथे शुभम आंबटकरने तिच्या मोटारसायकलला ओवरटेक करत तिला अडवले आणि वाद केलेली "मुलगी तूच आहेस का?" अशी धमकी दिली. यानंतर, वाद वाढला आणि रस्त्यात सुरु असलेल्या वादात सुधीर खरकाटे आणि त्यांची पत्नी कारने तेथे पोहोचले. वाद वाढल्यावर बचबाची सुरू झाली आणि ती हाणामारीत रुपांतरित झाली.
सुधीर खरकाटे आणि त्याच्या पत्नीने तरुणीला रागाच्या भरात तिचे केस पकडून तिच्यावर हाताबुक्याने मारहाण केली, ज्यामुळे ती गंभीरपणे जखमी झाली. वैद्यकीय अहवालानुसार, रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे आणि आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तरुणीला भररस्त्यात झालेल्या मारहानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. या प्रकरणात आरोपीना न्यायलाय्याने जमीन दिला असून पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून शंका उपस्थित केल्या जातं आहे.
Edit by: चेतन व्यास
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.