Mumbai Monsoon Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Monsoon Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, सखल भागात साचले पाणी; रेल्वे-रस्ते वाहतुकीवर परिणाम

Mumbai Update : मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्ये पाणी साचले असून लोकल सेवा उशिराने धावत आहे.

Alisha Khedekar

Mumbai Weather Update: जुलै महिन्यातील तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच पावसाने चांगलाच जोर धरला होता. हा जोर आठवड्याच्या शेवटीही कायम राहिला आहे. राज्यात पावसाने जोर धरला असून सर्वदूर पावसाचे सावट कायम आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई शहरांत पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जरी केला आहे. तसेच पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे मुंबईसह उपनगरांच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईत रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रात्री पासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून अंधेरीमधील सबवे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. धो धो पडणाऱ्या पावसाचा परिणाम मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलवर झाला आहे. पश्चिम, हार्बर तसेच मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. तसेच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला याचा फटका बसत आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई मध्ये देखील पावसाचे आगमन झाले आहे. मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जरी केला असून नागरिकांना गरज असेल तरचं घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पुढील तीन दिवसांसाठी भरती-ओहोटीचा इशारा दिला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासासाठी सात जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या उंच लाटा धडकणार असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मागील ४८ तासांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने आजही हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT