Maharashtra Monsoon Update : तीन दिवसात राज्यात जोरदार पाऊस; मुंबई, ठाण्याला झोडपणार, वाचा कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट

Weather Update : मुंबईसह उपनगरांत जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून घाटकोपरमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.
Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon Update Saam Tv
Published On

मुंबईत गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतली असून आठवड्याच्या सुरवातीला पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे. सध्या आकाशात काळे ढग दाटून आले असून हवामान विभागाकडून आज दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे.

मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे अंधेरीतील सबवे पाण्याखाली गेला आहे. तसेच आज सकाळच्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. धो धो पडणाऱ्या पावसामुळे घाटकोपर स्टेशन बाहेर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. ठाण्यात दुपारपासून पावसाचा जोर वाढणार असून राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार आहे.

Maharashtra Monsoon Update
Monsoon Skin Care: ड्राय स्कीनला कंटाळात? तर करा 'हे' ५ सोपे घरगुती उपाय, त्वचा होईल सॉफ्ट

राज्यभरात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु झाली असून २४ तासात ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Monsoon Update
Monsoon Health Tips: पावसाळ्यात अपचन होतंय? मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

दरम्यान हवामान विभागाकडून २१ ते २३ जुलै पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com