ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोकांची त्वचा खूप ड्राय असते, ज्यामुळे त्यांना त्वचेशी संबधित अनेक समस्या होतात. महागड्या प्रोडक्टसचा वापर करुनही ड्राय स्कीनची समस्या कमी होत नाही.
आज आम्ही तुम्हाला ड्राय स्कीनसाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत नक्की ट्राय करा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला नारळाच्या तेलाने चांगले मसाज करावे. यामुळे त्वचा सॉफ्ट होईल.
तुम्ही तुमच्या त्वचेला मधाने देखील मसाज करु शकता. यामुळे स्कीन मॉइश्चराइज्ड होते.
जर तुम्हाला सॉफ्ट आणि ग्लोइंग स्कीन हवी असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दहीचा मास्क लावू शकता.
ड्राय स्कीन असेल तर चेहऱ्यावर कोरफड लावून मसाज करु शकता. यामुळे स्कीन सॉफ्ट होईल.
ड्राय स्कीनला सॉफ्ट करण्यासाठी, तुम्ही चेहऱ्यावर कच्चे दूध लावून तुमची त्वचा स्वच्छ करु शकता.