ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या सायबर गुन्ह्यांमध्ये तुमचे खाते सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे.
राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलने पासवर्डशी संबंधित काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.
एनसीसीआरपीच्या सूचनेनुसार, तुमच्या पासवर्डमध्ये नेहमी लहान आणि मोठ्या अक्षरांसह संख्या आणि विशेष कॅरेक्टर म्हणजेच वर्ण वापरा.
तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड कमीत कमी 8 अक्षरांचा असावा. बरेच लोक एकाच पासवर्डचा वापर अनेक ठिकाणी करतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे.
सर्व खात्यांसाठी, विशेषतः बँकिंग आणि सोशल मीडियासाठी वेगवेगळे पासवर्ड तयार करा. असे केल्याने हॅकर्सना योग्य पासवर्ड शोधणे कठीण होते.
तुमचा पासवर्ड, ओटीपी, पिन इतर कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या सोशल मीडिया आणि बँकिंग खात्यांचे पासवर्ड काही दिवसांनी नियमितपणे बदलत राहा.
सार्वजनिक वाय-फाय वापरु नका किंवा वाय-फाय वापरुन कोणतेही व्यवहार करु नका याची काळजी घ्या.