Pune Rain And Dam Water Storage:  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Rain: पुण्यात पावसाचा जोर कायम, खडकवासला धरण जून संपण्यापूर्वीच ६३ टक्के भरले, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

Pune Rain And Dam Water Storage: पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जून महिना संपण्यापूर्वीच खडकवासला धरण ६३ टक्के भरले.

Priya More

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. जून महिना संपण्यापूर्वीच पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण ६३ टक्के भरले. पुणे शहरासह आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. पुणे जिल्ह्यांतील इतर धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्यामुळे या धरणांच्या देखील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. धरण साखळी क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली. पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली असून समाधानकारक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात जास्तीच पाणी साठवणूक झाली आहे. आज पुण्याला पुण्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धराणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. खडकवासला धरणात सर्वात जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरण ६३.६० टक्के भरले आहे. तर त्यापाठोपाठ पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणामध्ये देखील पाणीसाठा चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासलानंतर वरसगाव धरणात ४२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा ३८.६७ टक्के जमा झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा २६.३५ टक्के जास्त आहे.

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती जलसाठा?

खडकवासला- ६३.६० टक्के

पानशेत - ३४.०७ टक्के

वरसगाव - ४२.९९ टक्के

टेमघर- २३.६८ टक्के

चार ही धरणात एकूण धरण साठा- ३८.६७ टक्के

मागच्या वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा - १२.३२ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health: पेनकिलर, अँटीबायोटिक्स खाण्याची सवय आहे? 'ही' औषधे घेतल्याने हृदयावर होतो परिणाम

Maharashtra Live News Update: निवासी आश्रम शाळेतील 8 वर्षाच्या मुलाची हत्या,जालन्यात खळबळ

Pankaj Deshmukh Death Case: आमदार कुटेंच्या कार चालकाचा संशयस्पद मृत्यू प्रकरण; भाजप कार्यकर्त्यांकडून देशमुख कुटुंबियांनी धमक्या

Credit Card: गर्दीत उभे राहाल, कंगाल व्हाल? टॅप अँड पे सुरू असल्यास खातं होईल रिकामी?

Marathi Language Controversy : तुम्ही मारहाण केल्याने मी लगेच मराठीत बोलेल का? भाषावादावर राज्यपालांचं मोठं भाष्य, VIDEO

SCROLL FOR NEXT