Bhushi Dam : धरणातील पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही; धरणात उतरताच अनर्थ घडला, दोघे मित्र बुडाले

Maval News : साहिल आणि मोहम्मद जमाल हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्ताने ते लोणावळा परिसरात आले होते. रविवार असल्याने हे दोघेजण मित्रांसोबत पर्यटनासाठी लोणावळ्यातील भुशी धरणामध्ये आले
Maval News
Maval NewsSaam tv
Published On

मावळ : लोणावळ्यातील पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षित असलेल्या भुशी धरणात फिरण्यासाठी अनेकजण येत असतात. त्यानुसार मित्रांसोबत पर्यटन व वर्षवेरासाठी आले असता धरणातील पाणी पाहून पोहण्याच्या मोह आवरला गेला नाही. यातूनच पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले असता उत्तर प्रदेश येथील दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

लोणावळ्यातील भुशी धरणात दुपारच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. या घटनेत साहिल अश्रफ अली शेख आणि मोहम्मद जमाल असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. दरम्यान साहिल आणि मोहम्मद जमाल हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्ताने ते लोणावळा परिसरात आले होते. रविवार असल्याने हे दोघेजण मित्रांसोबत पर्यटनासाठी लोणावळ्यातील भुशी धरणामध्ये आले होते. 

Maval News
Jalgaon : गावाकडे परतताना एकुलत्या एक मुलाला हिरावले; रेल्वेतून पडून मुलाचा मृत्यू, आईचा आक्रोश

पोहण्याचा मोह बेतला जीवावर 

भुशी धरणातील पाणी पाहून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. यामुळे सोबत असलेले सर्वजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते धरणातील खोल पाण्यात गेले असताना बुडाले. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तर घटनेची माहिती लोणावळा पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

Maval News
Crime News : बिजासन घाटात दरोडा; गाडी अडवत १८ लाख रुपयांची रोकड लुटली

पथकाने दोघांच्या मृतदेह काढले बाहेर 

लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह शिवदुर्ग टीम आपत्कालीन पथक व स्थानिक युवक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने शोध घेत धरणाच्या पाण्यात बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढले आहे. दोन्ही मृत तरुणांच्या घरच्या मंडळींना घटनेची माहिती देण्यात आली असून अधिक तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com