Pune Bus Stop Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Bus Stop: पुणेकरांसाठी गुड न्यूज! १७०० बस थांबे होणार स्मार्ट, काय आहे PMPMLचा प्लान?

Good News For Punekar: पुणेकरांसाठी आनंदीची बातमी आहे. पुण्यातील बस थांबे आता आधुनिक होणार आहेत. पुण्यात १७०० ठिकाणी स्मार्ट बस थांबे उभारण्यात येणार आहे. PMPMLचा नक्की प्लान काय आहे? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • बसने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

  • पुण्यातील १७०० बस थांबे स्मार्ट बनवण्यात येणार आहेत

  • दिल्लीच्या मॉडेलप्रमाणे स्मार्ट बस थांब्यांची रचना केली जाणार.

  • पावसाळा आणि उन्हाळ्यात या बस थांब्यामध्ये अधिक सुविधा मिळणार.

  • डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही आणि रिअल-टाइम माहिती देणारे पॅनेल बस थांब्यांवर असणार.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील बसथांबे आधुनिक आणि स्मार्ट होणार आहेत. दिल्लीच्या धर्तीवर या बस थांब्यांची निर्मिती केली जाणार आहे. सुरूवातीला पुण्यात १७०० ठिकाणी ही आधुनिक बस थांबे उभारले जाणार आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएमपीएमएलने दिल्लीच्या मॉडेलपासून प्रेरित होऊन आधुनिक आणि स्मार्ट बस थांबे बांधण्याचा मानस केला आहे. या माध्यमातून पुण्यातील बस थांब्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत पीएमपीएमएलने निर्णय घेतला आहे.

या स्मार्ट बस थांब्यावर फक्त जाहिरातीच नाही तर प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेली माहिती देखील दिली जाणार आहे. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये ही बस थांबे प्रवाशांना जास्त उपयोगी ठरणार आहेत. कारण या बस थांब्यामुळे ऊन आणि पावसामुळे प्रवाशांचा बचाव होणार आहे. पीएमपीचे पथक लवकरच दिल्लीतील स्मार्ट बस थांब्याची माहिती घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.

पीएमपीच्या अधिकाऱ्यांच्या मते, पीएमपीएमएलचे एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला भेट देऊन त्यांच्या स्मार्ट बस थांबा पायाभूत सुविधांचा अभ्यास आणि पाहणी करणार आहे. पीएमपीएमएल अध्यक्ष आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्यात या उपक्रमाबाबत चर्चा आधीच झाली आहे. ज्यावरून सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न दिसून येत आहेत.

या स्मार्ट बस थांब्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुटसुटीत होण्यास मदत होणार आहे. पीएमपीएमएलचे उद्दिष्ट विविध सुधारणांच्या माध्यमातून त्यांचे वाहतूक नेटवर्क अधिक प्रवासी-केंद्रित बनवण्याचे आहे आणि बस थांब्यांचे आधुनिकीकरण हा या धोरणाचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. नवीन थांबे स्मार्ट, आधुनिक, सुसज्ज आणि माहितीपूर्ण करण्याचा प्रयत्न पीएमपीचा आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात अंदाजे १,७०० नवीन स्मार्ट बस थांबे प्रस्तावित आहेत. हे बांधा-चालवा-हस्तांतरण (BOT) मॉडेल अंतर्गत बांधले जाणार आहेत.दिल्लीच्या स्मार्ट बस थांब्यांमध्ये डिजिटल डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे, रिअल-टाइम बस माहिती पॅनेल, सार्वजनिक सेवा संदेशासाठी समर्पित जागा आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या डिझाइन आहेत. अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित वाहतूक वातावरण तयार करण्यासाठी पीएमपीएमएलचा प्रयत्न आहे. दिल्लीप्रमाणेच पुणेकरांनाही या सुविधा मिळाव्यात असा पीएमपीएचा मानस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT