अक्षय बडवे
पुणे : पुणे शहरात वेगवेगळ्या मार्गांवर पीएमपीएलची बस सेवा सुरु आहे. मात्र रात्रीच्या वेळी पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी हि बससेवा नसल्याचे प्रवाशांना अडचणीचे व्हायचे. मात्र पुण्यात रात्री येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी सहा मार्गांवर पीएमपीएल बसची सेवा सुरू करण्यात आली. या रातराणीच्या सहा मार्गावर धावणाऱ्या पीएमपीएलला गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पुणे हे आयटी हब म्हणून ओळखले जाते. त्या अनुषंगाने रात्रीच्या वेळी पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर ये- जा असते. अनेक वेळा रिक्षा चालक प्रवाशांना जायचे त्या ठिकाणी जाण्यास नकार देतात. तसेच ऑनलाइन कॅब बुक करून जाणं अनेकांना परवडत नाही. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना काहीसा खोळंबा व्हायचा. अशातच हे प्रवासी पीएमपीएल बसला प्राधान्य देत आहेत.
रात्रीच्या बसही धावताय फुल्ल
पीएमपी प्रशासनाने अशा मार्गांवर बस सेवा सुरू केली आहे. जे शहरातील महत्त्वाचे ठिकाण आहेत. पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट, कात्रज अशा मध्यवर्ती भागातून या बस जातात. त्यामुळे अनेक नागरिक या बस सेवेचा फायदा घेताना दिसतात. यामुळे रात्री धावणाऱ्या पीएमपी बस अनेक वेळा प्रवाशांनी भरलेल्या पाहायला मिळतात. परिणामी प्रशासनाला रात्रराणी बस सेवेतून गेल्या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पुण्यातील हे आहेत रातराणी मार्ग
रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहता पीएमपी कडून नव्या मार्गावर आणखी बस सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीला पुण्यातील कात्रज ते शिवाजीनगर बस स्थानक, पुणे स्टेशन ते एनडीए गेट, हडपसर ते स्वारगेट, हडपसर ते पुणे स्टेशन, निगडी ते पुणे स्टेशन, कात्रज ते पुणे स्टेशन या रातराणी मार्गावरून बस धावत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.