Toranmal Temperature : थंड हवेचे ठिकाण बनले हॉट; तोरणमाळला तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर

Nandurbar News : राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. अनेक शहरातील तापमान मागील दोन- तीन दिवसांपासून ४० अंशाच्या वर पोहचले असून दुपारच्या वेळी तर उष्ण झळा जाणवू लागल्या आहेत
Toranmal Temperature
Toranmal TemperatureSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या अक्रानी तालुक्यातील तोरणमाळ  सध्या हॉटस्पॉट बनले आहे.  वाढलेल्या तापमानानुसार तोरणमाळमध्ये देखील पारा वाढत चालला असून येथील तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. याठिकाणी उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. तापमान वाढीमुळे सुट्यांमध्ये येथे येणाऱ्या पर्यटकांनी देखील पाठ फिरवली आहे.   

राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. अनेक शहरातील तापमान मागील दोन- तीन दिवसांपासून ४० अंशाच्या वर पोहचले असून दुपारच्या वेळी तर उष्ण झळा जाणवू लागल्या आहेत. यातच खानदेश देखील उन्हाने तापले असून जळगाव. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. यामुळे दुपारच्या वेळी बाहेर निघणे देखील आता शक्य होत नाही. अशातच थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ मध्ये देखील पारा वाढला आहे. 

Toranmal Temperature
Prakash Bidwalkar Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सिंधुदुर्गात पुनरावृत्ती, आरोपीचा आका कोण? बड्या नेत्याचा गंभीर आरोप

पर्यटकांनी फिरवली पाठ 

तोरणमाळ येथे तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गुजरात, मध्यप्रदेश आणि राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने तोरणमाळला हजेरी लावत असतात. मात्र आता थंड हवेचे ठिकाणचं गरम होत चाललं आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा हा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या वाढत्या तापमानामुळे पर्यटक आता पाठ फिरवताना पाहण्यास मिळत असून सद्या तोरणमाळमध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.

Toranmal Temperature
Hingoli PDCC Bank : पीडीसीसी बँकेत मारहाण प्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल; शेतकरीही करणार तक्रार

पर्यटकांनी फिरवली पाठ 

तोरणमाळ येथे तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गुजरात, मध्यप्रदेश आणि राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने तोरणमाळला हजेरी लावत असतात. मात्र आता थंड हवेचे ठिकाणचं गरम होत चाललं आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा हा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. या वाढत्या तापमानामुळे पर्यटक आता पाठ फिरवताना पाहण्यास मिळत असून सद्या तोरणमाळमध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.

खानदेशात उष्णतेची लाट 

राज्यात उन्हाचे चटके वाढू लागले आहेत. तर खानदेशात देखील मागील तीन- चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. तीन दिवसांपासून धुळे व जळगाव जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. धुळ्यातील तापमान ४२.५ अंश तर जळगावचे तापमान देखील ४२ अंशावर गेले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील तापमान ४१ अंशापर्यंत पोहचले असून पुढील काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com