Pune Train : पुणेकरांसाठी खुशखबर, रविवारपासून नवीन ट्रेन धावणार, नागपूरकरांना फायदा, वाचा कोण कोणते थांबे?

Pune Rewa Express : रविवारपासून पुण्यातून नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. या एक्सप्रेसचे कोण कोणते थांबे असतील, वेळ काय असणार? वाचा सविस्तर
Pune to Rewa direct train with full schedule and stops
Indian Railways launches a new Pune–Rewa Express starting August 3. The weekly train will connect Maharashtra and Madhya Pradesh via Nagpur, Jabalpur. Check timings, full route, and coach details.Saam TV News Marathi
Published On
Summary
  • पुणे–रीवा एक्सप्रेस ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

  • ही ट्रेन मध्यप्रदेशातील रीवा शहराशी थेट जोडणी देणार आहे.

  • दर गुरुवारी पुणेहून आणि दर बुधवारी रीवाहून सुटणार.

  • नागपूर, जबलपूरसह १३ प्रमुख स्थानकांवर थांबे असणार.

Pune to Rewa direct train with full schedule and stops : पुणेकरांना रेल्वे मंत्रालयाकडून खुशखबर देण्यात आला आहे. रिवा आणि पुणे या दरम्यान रविवार, ३ ऑगस्टपासून नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे.  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. महत्त्वाचे म्हणजे, रिवा आणि पुणे दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी देणारी ही पहिली ट्रेन आहे. पुणे-रिवा असा प्रवास करणाऱ्यांना आता आरामदायी प्रवास करता येणार आहे. या नव्या एक्सप्रेसचा नागपूरकरांना फायदा होणार आहे. पुणे-रिवा यादरम्यान धावणारी एक्सप्रेस नागपूरमध्ये थांबणार आहे. त्यामुळे पुणे-नागपूर असा प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.

भारतीय रेल्वे नवीन पुणे -रिवा -पुणे एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. या दोन शहरांना जोडणारी ही (कनेक्टिव्हिटी) पहिली ट्रेन असेल. सध्या या दोन ठिकाणांदरम्यान अप्रत्यक्ष जोडणी उपलब्ध आहे. पण ह्या नव्या ट्रेननमुळे प्रवास अधिक सोयीचा आणि सुलभ होईल. पुणे हे एक ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र आहे आणि महाराष्ट्रातील आळंदी, पंढरपूर, अक्कलकोट इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारे ठिकाण आहे. रिवा देखील ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र असून केओटी व बहुती धबधबे, व्हाइट टायगर सफारी यांसारख्या आकर्षणांसह एक पर्यटनस्थळ देखील आहे. ही ट्रेन महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा प्रदान करणार आहे.

Pune to Rewa direct train with full schedule and stops
Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

या ट्रेनमुळे महाराष्ट्रातील पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट,नैनपुर, जबलपुर, कटनी, सतना ,रीवा ही शहरे परस्पर जोडली जातील. ही ट्रेन आरक्षित आणि अनारक्षित प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात येत आहे. ह्या ट्रेनमुळे नियमित प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच सुट्टीमध्ये प्रवासाला जाणारे प्रवासी यांच्यासाठीही उपयुक्त ठरेल. यामुळे पर्यटन आणि तीर्थयात्रेला चालना मिळेल तसेच व्यापार आणि उद्योगासाठी नव्या संधी निर्माण होतील.

Pune to Rewa direct train with full schedule and stops
Cabinet Reshuffle : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल, राज्याला नवे कृषिमंत्री अन् क्रीडा मंत्री मिळाले, वाचा सविस्तर

पुणे-रिवा एक्सप्रेसची वेळ काय?

ट्रेन क्र. 20151 पुणे–रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता रिवा स्थानकावर पोहोचेल.

ट्रेन क्र. 20152 रिवा–पुणे एक्सप्रेस दर बुधवारी ०६.४५ वाजता रिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.४५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

Pune to Rewa direct train with full schedule and stops
भयंकर CCTV ! खड्ड्यामुळे दुचाकी स्लीप, धावत्या कारच्या चाकाखाली आजोबा चिरडले, थरकाप उडवणारा VIDEO

कोणकोणत्या स्थानकावर ही ट्रेन थांबणार -

दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना.

एक्सप्रेसची रचना कशी असेल?

२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन, असे सरंचना असेल.

Pune to Rewa direct train with full schedule and stops
Maharashtra Cabinet Reshuffle : कोकाटेंची उचलबांगडी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया?
Q

पुणे–रीवा एक्सप्रेस कधी सुरू होणार आहे?

A

पुणे–रीवा ही एक्सप्रेस रविवार, ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

Q

पुणे–रीवा ही ट्रेन कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार आहे?

A

दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी, सतना.

Q

पुणे–रीवा ही ट्रेन कोणत्या दिवशी धावेल?

A

पुणे–रीवा (गुरुवारी), रीवा–पुणे (बुधवारी) हे दोन फेऱ्या आठवड्यातून असतील.

Q

पुणे–रीवा या ट्रेनचे वैशिष्ट्य काय आहे?

A

ही ट्रेन पुणे–रीवा दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी देणारी पहिली ट्रेन आहे, ती वेगवान, आरामदायक असून पर्यटक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com