Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

Shirdi to Tirupati Direct Travel : शिर्डी ते तिरुपती दरम्यान एकूण १८ साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. ४ ऑगस्ट २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल. कोपरगाव, औरंगाबाद, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, सिकंदराबाद, गुडूर, रेणिगुंटा इत्यादी ठिकाणी थांबे असतील.
Train
TrainSaam Tv
Published On
Summary
  • साईनगर शिर्डी आणि तिरुपती दरम्यान १८ विशेष साप्ताहिक गाड्यांची घोषणा.

  • गाड्या ४ ऑगस्ट २०२५ पासून २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावणार.

  • कोपरगाव, औरंगाबाद, परभणी, गुडूरसह अनेक स्थानकांवर थांबे असणार.

  • आरक्षणाची सुविधा १ ऑगस्टपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध.

Sai Nagar Shirdi to Tirupati weekly express train route : साईनगर शिर्डी आणि तिरुपती या दोन देवस्थानाला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातून तिरूपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यातून साईंच्या दर्शनाला हाजारो भक्त येतात. तिरूपती अन् शिर्डी या दोन देवस्थानाला जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. तिरूपती आणि शिर्डीला जाणाऱ्या भक्तांसाठी मध्य रेल्वेने १८ एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेची भक्तांसाठी खास भेट साईनगर शिर्डी आणि तिरुपती दरम्यान १८ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती रेल्वेकडून अधिकृत देण्यात आली आहे. या १८ ट्रेनमुळे दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमध्ये थेट जोडणी होणार असून, श्री साईबाबा आणि श्री वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनाची संधी निर्माण होणार आहे. पाहूयात कोणकोणती ट्रेन सुरू होणार आहे? त्याशिवाय कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?

साईनगर शिर्डी – तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन (१८ सेवा)

ट्रेन क्र. 07638 साप्ताहिक विशेष दर सोमवारी ०४.०८.२०२५ ते २९.०९.२०२५ या कालावधीत १९.३५ वाजता साईनगर शिर्डी येथून प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी ०१.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. (एकूण ९ सेवा)

ट्रेन क्र. 07637 साप्ताहिक विशेष दर रविवारी ०३.०८.२०२५ ते २८.०९.२०२५ या कालावधीत ०४.०० वाजता तिरुपती येथून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४५ वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचेल. (एकूण ९ सेवा)

Train
Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

कोणत्या स्थानकावर थांबणार ?

कोपरगाव, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, सेलू, परभणी, गंगाखेळ, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भाळकी, बीदर, झहीराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, नलगोंडा, मिर्यालगुडा, नाडीकुडे, पिडुगुरल्ला, सत्तेनपल्ले, तेनाली, चिराला, ओंगोल, गुडूर आणि रेणिगुंटा.

आरक्षण कधी होणार?

सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असल्याप्रमाणे सामान्य शुल्क आकारून, अनारक्षित कोचसाठी यूटीएस प्रणालीद्वारे बुकिंग करता येईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. गाडी क्रमांक 07638 या विशेष गाडीच्या आरक्षणाची सुविधा ०१.०८.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच [www.irctc.co.in] (http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

Train
Actress Arrested : अभिनेत्रीने दारूच्या नशेत २१ वर्षाच्या मुलाला कारने उडवले, जागेवरच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com