
औंध, पुणे येथे भीषण अपघातात ६१ वर्षीय आजोबांचा मृत्यू
रस्त्यावरील खड्ड्यात गाडी स्लीप होऊन कारखाली चिरडले गेले
सीसीटीव्हीमध्ये अपघाताचे धक्कादायक दृश्य कैद
नागरिकांमध्ये संताप; PMCच्या कामावर प्रश्नचिन्ह
Pune Accident CCTV Video : अंगाचा थरकाप उडवणारा पुण्यातील व्हिडिओ समोर आला आहे. खड्ड्यामुळे गाडी स्लीप झाली अन् चालक मागून आलेल्या कारच्या चाकाखाली गेले. दुचाकी चालवणारे ६१ वर्षांच्या आजोबाचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील औंधमध्ये हा भयंकर अपघात झाला. अपघातानंतर पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल पुणेकरांकडून विचारला जात आहे.
पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतला आहे. पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोरील असलेल्या खड्ड्यामुळे भयंकर अपघात झाला. रस्त्यावरुन जाताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडी घसरली अन् मागून आलेल्या कारखाली दुचाकी चालक चिरडला गेला. संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांचा संताप अनावर झाला असून या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
पाहा व्हायरल होणारा व्हिडिओ....
पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव घेतला आहे. जगन्नाथ काशिनाथ काळे असं अपघातात मृत्यू झालेल्या ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोरुन गाडी चालवत असताना रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्या मध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून गाडी घसरली. यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा तोल गेला. मात्र तेवढ्यात ज्येष्ठ नागरिक मागून आलेल्या कारच्या खाली चिरडले गेले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.