Maharashtra Cabinet Reshuffle : कोकाटेंची उचलबांगडी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया?
माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रालयातून उचलबांगडी
दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी
कोकाटे यांना क्रीडा खाते देण्यात आले
शिंदे यांच्यावर वादग्रस्त मंत्र्यांविरोधात कारवाईचा दबाव
Why Manikrao Kokate was removed from agriculture ministry : महाराष्ट्राच्या मंत्रिंडळात फेरबदल करण्यात आला असून माणिकराव कोकाटे यांची उलचबांगडी करण्यात आली आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषीमंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. तर माणिकराव काकोट यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. यावर महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि अजितदादांनी मिळून घेतलाय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय...हे सरकार सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचे आहे असंही त्यांनी म्हटलंय..
एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळून कोकाटे यांच्याबाबत हा निर्णय घेतलेला आहे. सरकार हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये केले. आतापर्यंतच्या इतिहासात ४५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मग ते नुकसान भरपाई असेल, शेतकरी सन्मान योजना असेल सोयी सुविधा असेल यामाध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. यापुढे महायुती शेतकऱ्यांना मदतीचा ओघ कायम ठेवणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंवर दबाव वाढला? खाते बदल करणार का?
अजित पवार यांनी वादग्रस्त माणिकराव कोकाटे यांची उलचबांगडी केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यावरही वादग्रस्त मंत्र्यांचे खाते बदल करण्याचा दबाव वाढला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश कदम, संजय शिरसाट, दादा भुसे, संजय गायकवाड हे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जात आहे. आता एकनाथ शिंदे या मंत्र्यांवर कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे. त्यात अजित पवार यांनी वादग्रस्त कोकाटे यांची उचलबांगडी केली, त्यामुळे आता एकनाथ शिंदेवरही दबाव वाढलाय.
माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी का करण्यात आली?
कोकाटे यांच्यावर विविध वादांमुळे तक्रारी होत्या. विधानभवनात हिवाळी अधिवेशनात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळून निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता कोणतं खाते आहे?
माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे.
कृषी मंत्रालय कुणाकडे देण्यात आलं?
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव का वाढलाय?
शिवसेनेचे काही मंत्रीही वादग्रस्त आहेत. कोकाटे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर, शिंदे यांच्यावर त्यांच्या पक्षातील वादग्रस्त मंत्र्यांवरही कारवाई करण्याचा दबाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.