LPG Price Cut: खुशखबर! एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, आजपासून नवे दर लागू

Commercial LPG cylinder : १ ऑगस्टपासून व्यावसायिक १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर ३३.५० रुपयांनी कमी झाले आहेत. नवी दिल्लीमध्ये दर ₹1,631.50, मुंबईमध्ये ₹1,583.00, कोलकातामध्ये ₹1,735.50 तर चेन्नईमध्ये ₹1,790.00 झाले आहेत.
LPG Price
LPG PriceSaam Tv
Published On
Summary
  • १ ऑगस्ट २०२५ पासून १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात ₹33.50 ची घट

  • दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये नवीन दर लागू

  • घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

  • उज्ज्वला योजनेतून लाभार्थ्यांना ₹300 ची सबसिडी, परिणामी गॅस ₹552 मध्ये

LPG Price Cut August 1 : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य अन् व्यावसायिकांना महागाईपासून दिलासा मिळाला आहे. आजपासून (१ ऑगस्ट) देशात कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलो वजनाता व्यवसायिक गॅसची किंमत आजपासून ३३.५० रूपयांनी कमी करण्यात आली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर रेस्टोरेंट्स, हॉटल्स, लग्न, ढाबे या ठिकाणी वापरण्यात येतो. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एप्रिल २०२५ मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रूपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर अद्याप दर जैसे थे आहेत. (Latest LPG cylinder rates in Mumbai, Delhi, Kolkata)

मागील चार महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. जुलै 2025 मध्ये गॅसच्या किंमतीत ३० रुपयांची कपात झाली होती. एप्रिल 2025 मध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 6 रुपयांची वाढ झाली, दिल्लीत दर 1,803 रुपये झाले. मे मध्ये 19.50 रुपयांची कपात झाली, दर 1,783.50 रुपये झाले. जून मध्ये किंमतीत कोणताही बदल झाला नाही, दर स्थिर राहिले. जुलै मध्ये 30 रुपयांची घट झाली, दर 1,753.50 रुपये झाले. आता ऑगस्टमध्ये 33.50 रूपयांनी दर कमी झाले आहेत. पाहूयात आज प्रमुख शहरात गॅसची किंमत किती झाली?

मुख्य शहरांतील नवीन व्यावसायिक एलपीजी किंमती

नवी दिल्ली: किंमत ₹1,665.00 वरून ₹1,631.50 वर घसरली

कोलकाता: ₹1,769.00 वरून ₹1,735.50 वर कमी

मुंबई: ₹1,616.50 वरून ₹1,583.00 वर उतरली

चेन्नई: ₹1,823.50 वरून ₹1,790.00 वर घसरली

LPG Price
Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही -

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 8 एप्रिल 2025 पासून आतापर्यंत स्थिर आहे. सरकारने यात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या चार महिन्यांत किंमती ना वाढवण्यात आल्या ना कमी करण्यात आल्या. एलपीजी सिलेंडरच्या किंमती स्थिर राहण्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवरही होईल. दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत अद्यापही ₹853 आहे तर मुंबईमध्ये १४ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर 852.50 रूपयांना मिळतोय. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत जैसे थे आहेत.

प्रमुख शहरातील घरगुती गॅसच्या किंमती -

₹853.00 - दिल्ली

₹879.00 - कोलकाता

₹852.50 - मुंबई

₹868.50 - चेन्नई

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळते अनुदान

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत सुमारे १० कोटी कुटुंबांना प्रत्येक सिलेंडरसाठी ₹300 चे अनुदान दिले जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबाला एलपीजी गॅस सिलिंडर ५५२ रूपयांना मिळतोय, कारण त्यांना ३०० रूपयांची सबसिडी दिली जाते.

LPG Price
Cabinet Reshuffle : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल, राज्याला नवे कृषिमंत्री अन् क्रीडा मंत्री मिळाले, वाचा सविस्तर
Q

एलपीजी सिलिंडरचे नवीन दर काय आहेत?

A

१ ऑगस्टपासून व्यावसायिक १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे दर ३३.५० रुपयांनी कमी झाले आहेत. नवी दिल्लीमध्ये दर ₹1,631.50, मुंबईमध्ये ₹1,583.00, कोलकातामध्ये ₹1,735.50 तर चेन्नईमध्ये ₹1,790.00 झाले आहेत.

Q

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणता बदल झाला आहे का?

A

नाही, ८ एप्रिलपासून घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. दिल्लीत दर ₹853, मुंबईत ₹852.50 आहे.

Q

उज्ज्वला योजनेअंतर्गत किती सबसिडी दिली जाते?

A

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक सिलिंडरवर ₹300 ची सबसिडी मिळते.

Q

व्यावसायिक गॅस सिलिंडर कुठे वापरले जातात?

A

व्यावसायिका सिलिंडर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लग्नसमारंभ, ढाबे आणि इतर व्यावसायिक ठिकाणी वापरला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com