Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: गुड न्यूज! मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, एसी लोकल होणार १८ डब्यांची; कसा आहे रेल्वेचा प्लान?

Mumbai AC Local: मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. मुंबईला आता १८ डब्यांची एसी लोकल मिळणार आहे. MRVC २,८५६ वंदे मेट्रो डब्यांची खरेदी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि प्रवास सुसाट होईल.

Priya More

Summary -

  • मुंबईला लवकरच १८ डब्यांची वातानुकूलित लोकल मिळणार.

  • MRVC ने २,८५६ वंदे मेट्रो डब्यांसाठी निविदा जाहीर केली.

  • हा प्रकल्प मेक इन इंडिया योजनेनुसार राबवला जाणार आहे.

  • प्रवाशांना आराम, सुरक्षा आणि वेगवान सेवा मिळेल.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलमध्ये मोठा बदल होणार आहे. मुंबईला १८ डब्यांची एसी लोकल मिळणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे २,८५६ वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दीर्घकालीन देखभालीसाठी ई-निविदा जाहीर करण्यात आली आहे. हे वंदे मेट्रो डबे १२, १५ आणि १८ डब्यांच्या रचनेत उपलब्ध होतील. या लोकलमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी, सुरक्षित आणि सुसाट होणार आहे.

मुंबईमध्ये सध्या लोकल १२ डब्यांच्या लोकल धावतात. काही लोकल १५ डब्यांच्या आहेत. प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून लोकलची संख्या आणि डब्यांची संख्या वाढण्याचा विचार सुरू आहे. गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेता मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल सेवा आणि आवश्यकतेनुसार १८ डब्यांच्या लोकलचा समावेश केला जाणार आहे.

६ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) फेज ३ आणि ३ ए अंतर्गत निविदा काढण्यात आली. आधुनिक वंदे मेट्रो डबे पुरवण्यासह पुढील ३५ वर्षांपर्यंत त्यांच्या देखभालीवर देखील भर देण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथे दोन अत्याधुनिक देखभाल-दुरुस्ती आगारे विकसित केली जाणार आहेत. निविदा सादरीकरण ८ डिसेंबरपासून सुरू होईल आणि निविदा उघडण्याची तारीख २२ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली. ही निविदा मेक इन इंडिया धोरणानुसार राबवली जाणार आहे. ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात समावेश होऊ शकेल. करार झाल्यानंतर दोन वर्षात पहिला प्रोटोटाईप रॅक मुंबईत दाखल होईल.

वंदे मेट्रो डब्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे, हे डबे वातानुकूलित आणि पूर्णपणे वेस्टिब्यूल्ड रॅक असणा आहे. जास्त त्वरण आणि ब्रेकिंग क्षमता त्यामध्ये असणार आहे. वेळेवर धावण्यासाठी उपयुक्त असणार आहे. सुरक्षेसाठी स्वयंचलित दरवाजे बंद प्रणाली देण्यात येणार आहे. आधुनिक आतील सजावट, मऊ आसने, मोबाइल चार्जिंग पॉईंट आणि माहितीप्रद प्रणाली असणार आहे. या लोकलची १३० किमी प्रति तासापर्यंत वेग क्षमता असेल. दोन्ही टोकांना विक्रेत्यांसाठी डबे असणार आहे. मुंबईच्या हवामानातील प्रवाशांच्या आरामाची खात्री करणे असे उच्च क्षमतेचे एचव्हीएसी या लोकलमध्ये असतील. या लोकलमध्ये जागतिक दर्जाच्या सुरक्षा प्रणाली असेल. ज्यात सुधारित ब्रेकिंग आणि प्रवासी प्रवाह डिझाईनचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT