
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची दिली आहे. महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत विशेषतः मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेत महत्वाचे बदल करण्यात आले. समितीने पहिल्या टप्प्यात तब्बल 268 वातानुकूलित (एसी) लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे.
फडणवीस यांनी यापूर्वीच मुंबईकरांना बंद दरवाजाच्या लोकल गाड्या देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता या गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. या नवीन गाड्या मेट्रोसारख्या आधुनिक असतील आणि उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांनी तयार केलेल्या असतील.
जुन्या विना-दरवाजाच्या लोकल गाड्या टप्प्याटप्प्याने कमी करुन त्याऐवजी या अत्याधुनिक गाड्या चालवल्या जातील. विशेष म्हणजे या गाड्यांसाठी तिकीट दर वाढवले जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर खरेदीची प्रक्रिया सुरू होईल.
पुढे या बैठकीत फक्त मुंबईच नाही तर पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान तब्बल 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मधल्या औद्योगिक भागांना अधिक वेगवान दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. यामुळे औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. पुण्यातील वाढत्या ट्रॅफिक समस्येतही या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.