ITR 2025 : आयटीआर परतावा कमी का मिळतोय? जाणून घ्या खरं कारण

Income Tax Refund : २०२५ मध्ये आयटीआर दाखल करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी परतावा मिळतोय. तज्ज्ञांच्या मते, सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली असून आयकर विभाग लवकरच दुरुस्ती करणार आहे.
Income Tax
Income TaxSaam tv
Published On

2025मध्ये आयटीआर दाखल करणाऱ्यांना परताव्याबाबत नाराजी व्यक्त करावी लागत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात अनेकांना अपेक्षेपेक्षा कमी रक्कम परत मिळाली आहे. सरकारने यंदा आयकर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून १५ सप्टेंबरपर्यंत वाढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांनी नुकतेच आयटीआर फाइलिंग सुरू केले आहे. मात्र, त्यांना मिळणाऱ्या परताव्यातील कपातीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सीए अदिती भारद्वाज यांनी सोशल मीडियावर यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मते, आयटीआर फाइलिंग सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आयकर कायदा, १९६१ च्या कलम २८८बी नुसार, परताव्याची रक्कम जवळच्या दहा रुपयांच्या पटीत पूर्ण केली पाहिजे. म्हणजेच जर परतावा ३५,८०७ रुपये असेल तर तो ३५,८१० रुपयांपर्यंत वाढवला पाहिजे. मात्र, या वर्षी प्रणाली अशाप्रकारे रक्कम पूर्ण करत नाही, त्यामुळे करदात्यांना थोडासा परतावा कमी मिळत आहे.

Tax2Win चे सह-संस्थापक अभिषेक सोनी यांनी या त्रुटीबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही चूक कायम राहिली तर आयकर कायदा १९६१ च्या कलम २८८बीचे उल्लंघन ठरेल. प्रत्येक करदात्याच्या पातळीवर रक्कम फारशी मोठी नसली तरी, देशभरातील लाखो करदात्यांच्या बाबतीत हा फरक कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तक्रारी वाढतील, अतिरिक्त प्रशासकीय भार निर्माण होईल आणि खटले दाखल होण्याचीही शक्यता आहे.

Income Tax
Chanakya Niti : नवरा बायकोत 'ही' गोष्ट नसेल तर तुटेल नातं

विशेष म्हणजे ही समस्या कोणत्याही धोरणात्मक बदलामुळे नसून, सॉफ्टवेअरमधील पद्धतशीर बिघाडामुळे उद्भवली आहे. त्यामुळे आयकर विभाग लवकरच याबाबत स्पष्टीकरण देईल आणि दुरुस्ती करेल अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Income Tax
Home Loan : गृहकर्जदारांसाठी खुशखबर! मोठ्या बँकांनी व्याज केलं कमी, EMI होणार स्वस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com