Sakshi Sunil Jadhav
नवरा बायकोमध्ये घटस्फोटाच्या आणि वाद होण्याच्या घटना आपण वारंवार ऐकत असतो.
पुढे आपण नवरा बायकोमधील नातं मजबूत होईल आणि त्यांच्यातील वाद तुटणार नाहीत अशा काही गोष्टी किंवा टिप्स सांगणार आहेत.
आचार्य चाणक्य म्हणतात, नवरा बायकोचं नातं हे फक्त एका जन्मासाठीच नाही तर पुढच्या सातही जन्मासाठी बांधलेले असते.
तुम्ही पुढील गोष्टींचे पालन केल्यास वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि नातंही तुटणार नाही.
चाणक्यांच्या मते, एकामेकांवर विश्वास ठेवा. कोणत्याही गोष्टीवरुन मनात संशय निर्माण करु नका.
एखाद्या किरकोळ विषयावरही नवरा बायकोयांनी मिळून चर्चा केली पाहिजे. याने बरेच वाद टळू शकतात.
आचार्य चाणक्य म्हणतात, सुखी जीवनात आदराचा महत्वाचा वाटा असतो.