Drug Factory : आतापर्यंतची सर्वात मोठी रेड, तब्बल १२००० कोटींचे ड्रग्ज जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Police Drug Factory Raid : मुंबई पोलिसांनी तब्बल १२,००० कोटी रुपयांचे मेफेड्रोन (MD) ड्रग्ज जप्त करण्यात आले. तेलंगणातील हैदराबादजवळील चेरलापल्ली येथील वाघदेवी लॅब्स या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.
Mumbai Drugs Racket
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई पोलिसांनी १२,००० कोटींचे मेफेड्रोन (MD) ड्रग्ज जप्त

  • हे या वर्षातील देशातील सर्वात मोठे ड्रग्ज ऑपरेशन मानले जाते.

  • रासायनिक कारखान्याच्या आडून ड्रग्ज उत्पादन सुरू होते.

  • पोलिसांनी १२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी तेलंगणामध्ये ड्रग्स साम्राज्याचा अंत केलाय. वसई विरार, मीरा भायंदर पोलिसांनी तेलंगणातील हैदराबादमध्ये ड्रग्ज कारखान्यावर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी तब्बल १२००० कोटी रूपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केलेय. हा या वर्षातील देशातील सर्वांत मोठा आणि भयंकर छापा असल्याचे म्हटले जातेय. पोलिसांनी ड्रग्ज कार्टेलचा भंडाफोड केलाय. अँटी-नार्कोटिक्स सेल आणि क्राइम ब्रँचने या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारखान्याचा मालक आणि रासायनिक तज्ज्ञ श्रीनिवास वालोटी याच्यासह त्याचा सहकारी तानाजी पाटे यांना ताब्यात घेतलेय. पुढील तपास सुरू करण्यात आलाय.

तेलंगणामधील एका रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यात हे मोठं ड्रग्स कार्टेल सुरू होतं. त्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलेय. पोलिसांनी या धाडीमध्ये तब्बल १२,००० कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन (MD) जप्त केलेय. मेफेड्रोनला म्याऊ म्याऊ, मेफ, एम-कॅट, आणि मियाव यासारख्या नावाने कार्टेलमध्ये ओळखलं जायचं. पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांची ही कारवाई या वर्षांतील देशातील सर्वात मोठी कारवाई आहे.

Mumbai Drugs Racket
आताच तिकिट बुक करा! दिवाळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

मुंबई पोलिसांनी अँटी-नार्कोटिक्स सेल आणि क्राइम ब्रँचने १२ जणांना अटक केली आहे. एका विदेशी नागरिकाच्या अटकेनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला, त्यावेळी हैदराबादमधील कार्टेलचा सुगावा पोलिसांना लागला. विदेशी नागरिकाकडून पोलिसांनी १०० ग्रॅम मेफेड्रोन (MD) आणि २५ लाख रुपये रोख जप्त केले होते. त्यानंतर पोलिसांनी अधिक कसून तपास केला. पोलिसांच्या तपासात आंतरराज्यीय नेटवर्क उघड झाले. पोलिसांच्या तपासात हे कनेक्श तेलंगणापर्यंत उघड जाले. हैदराबादमधील एका रासायनिक कारखान्याच्या आडून कार्टेल ड्रग्स तयार करण्यात येत असल्याचे उघड झाले. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारखान्यावर धाड टाकली. पोलिसांनी तब्बल १२ हजार कोटी रूपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले.

Mumbai Drugs Racket
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय! १०० कोटींची इमारत खरेदी करणार

पोलिसांनी कसा केला पर्दाफाश -

तेलंगणामधील या कार्टेलचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तगडा प्लॅन तयार केला. पोलिसांनी त्या टोळीमध्ये आपला माणूस पेरला. त्याच्याकडून आतमधील सर्व माहिती घेतली. त्यानंतर योग्य संधी साधून पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकली. मुंबई पोलिसांनी तेलंगणा पोलिसांच्या मदतीने ड्रग्ज कार्टेल उद्धवस्त केले. हैदराबादजवळील चेरलापल्लीमध्ये वाघदेवी लॅब्स या नावाने कारखाना सुरू होता. कारखाना बाहेरून कायदेशीर वाटत होता, पण आतमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तयार केले जात होते. पोलिसांनी धाड टाकत १२ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले. त्याशिवाय रासायनिक उपकरणे, ड्रग्स उत्पादन युनिट्स आणि जवळपास ३२,००० लिटर प्रिकर्सर केमिकल्ससह मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचा साठा जप्त केला

Mumbai Drugs Racket
Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com