Palghar Earthquake News Saam Tv
मुंबई/पुणे

Palghar Earthquake: पालघर भूकंपाने हादरलं, तीन दिवसात दुसरा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Palghar Earthquake News: एक मोठी बातमी समोर आली आहे. पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. रात्री 9 वाजून 52 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत.

रुपेश पाटील

Palghar Earthquake News:

एक मोठी बातमी समोर आली आहे. पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. रात्री 9 वाजून 52 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या तीन दिवसात हा दुसरा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

तलासरी, उधवा, मोडगाव ,धानिवरी, धुंदलवाडी, कासा ,उर्से या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. हा भूकंप 4.1 रिश्टर स्केल तीव्रते होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भूकंपामुळे कोणालाही दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. याआधीही 3 जानेवारी रोजी दुपारी 1:47 वाजता पालघरच्या डहाणू तालुक्यातील काही भागात 3.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. अधिकार्‍यांनी भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे हे स्पष्ट केले नाही. (Latest Marathi News)

दरम्यान मागीलवर्षी 2023 मध्येही पालघरमध्ये 3.5 आणि 3.3 तीव्रतेचे धक्के जाणवले होते. तसेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मत मोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

SCROLL FOR NEXT