Sakshi Sunil Jadhav
अनेक महिलांचा चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसतो, पण पापण्या (Eyelashes) खूप लहान किंवा विरळ असल्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य उठून दिसत नाही.
पापण्या कमी असल्यास डोळे थोडे फिके दिसू शकतात. मात्र काही घरगुती उपाय आणि योग्य मेकअप टिप्स वापरल्यास पापण्या अधिक दाट आणि आकर्षक दिसू शकतात.
पापण्यांच्या मुळाशी रोज रात्री थोडे कॅस्टर ऑइल लावल्यास पापण्यांची वाढ चांगली होते आणि त्या अधिक दाट दिसतात.
नारळ तेल पापण्यांना पोषण देण्याचे काम करते. हलक्या हाताने मसाज केल्यास पापण्यांची मजबुती वाढते.
अॅलोवेरा जेल पापण्यांना हायड्रेशन देऊन त्यांची वाढ सुधारण्यास मदत करते.
मेकअप करताना आयलॅश कर्लर वापरल्याने पापण्या वळलेल्या आणि उठून दिसतात.
डोळ्यांना आकर्षक लूक देण्यासाठी मस्कारा दोन हलक्या लेयर्समध्ये लावा. यामुळे पापण्या दाट आणि लांब दिसतात.
विशेष कार्यक्रम किंवा पार्टीसाठी फॉल्स आयलॅशेस वापरल्यास डोळ्यांचे सौंदर्य जास्त खुलते.
डोळ्यांच्या वरच्या भागावर बारीक आयलाइनर लावल्याने पापण्या दाट असल्याचा लूक मिळतो.
व्हिटॅमिन E, बायोटिन आणि प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास केसांप्रमाणेच पापण्यांची वाढही सुधारते.