Mumbai News: मुंबईत वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कॅब चालकांकडून वसूल केला 19.76 लाखांचा दंड

Mumbai Traffic Police Action: मुंबई वाहतूक पोलिसांनी ॲप आधारित 1690 कॅबची तपासणी करत मोठी कारवाई केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते.
Mumbai Traffic Police Action
Mumbai Traffic Police ActionSaam Tv

Mumbai Traffic Police Action:

मुंबई वाहतूक पोलिसांनी ॲप आधारित 1690 कॅबची तपासणी करत मोठी कारवाई केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान विहीत केलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन करणाऱ्या, दोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत कारवाई करण्यात येते.

मुंबई शहर व उपनगरांत 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ॲप आधारित 1690 कॅब वाहनांची तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या 491 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईपोटी 19 लाख 76 हजार 900 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Traffic Police Action
Aurangabad Airport Renamed: औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलावं, उद्धव ठाकरे यांचं ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र

प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत 590 वाहनांची तपासणीमध्ये 107 दोषी वाहनांवर 7 लाख 42 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुंबई (पश्चिम) कार्यालयांतर्गत 782 वाहनांची तपासणीमध्ये 211 वाहने दोषी आढळली आहेत.  (Latest Marathi News)

यामध्ये 7 लक्ष 93 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई (पूर्व) कार्यालयांतर्गत 318 वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 173 वाहने दोषी आढळली व त्यांच्याकडून 4 लक्ष 41 हजार 400 रुपयांचे दंडापोटी तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

Mumbai Traffic Police Action
Uddhav Thackeray Group: उद्धव ठाकरेंना बीडमध्ये मोठा धक्का, सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांच्यासह ३५ सरपंच शिंदे गटाकडे; कशामुळं होती नाराजी?

सर्वोच्च न्यायालयाने 13 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यात ॲप आधारित वाहनांसाठी महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ द ॲग्रेगेटर रुल्स, 2022 करण्यासाठी निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 27 नोव्हेंबर 2020 रोजी समुच्चयक मार्गदर्शक सूचना ॲप आधारित कॅब सेवा देणाऱ्या आस्थापनांकरीता निर्गमित केल्या आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com