आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या जवळ असतानाच ठाकरे गटामध्ये गळती सुरूच आहे. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. बीडमध्ये ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत.
अनिल जगताप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. जिल्हाप्रमुख पद काढून सह संपर्कप्रमुख केल्याने जगताप हे नाराज होते, असं बोललं जात आहे. अनिल जगताप यांच्यासह 35 सरपंच, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे बीडचे राजकीय गणित पूर्णपणे बदलणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पक्ष सोडताना अनिल जगताप यांनी ठाकरे गटाचे नेते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणले आहेत की, अंधारेंनी पक्ष संपवायची सुपारी घेतलीय. जगताप म्हणाले, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने अंधारेंनी कारस्थान करून माझं जिल्हाप्रमुख पद काढलं. अनिल जगताप म्हणाले, बीड विधानसभेचे तिकीट मिळाले नाही तरी मी विधानसभा लढवणार आहे. (Latest Marathi News)
याआधी परळी, अंबाजोगाई, वडवणी आणि केज येथीलही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षातून काढता पाय घेतला होता. सुषमा अंधारेंविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत येथील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला होता.
येथील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देताना म्हटले होते की, बीड जिल्ह्यात ठाकरे सेना तर अंधारे सेना निर्माण करण्याचं काम सुरु आहे. म्हणून आम्ही राजीनामा देत असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. इतक्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला येथे अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.