RBI Action: आरबीआयची मोठी कारवाई! 5 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?

Reserve Bank of India Imposed Fine: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशभरातील सर्व बँकांवर लक्ष ठेवण्याचं आणि नियम बनवण्याचं काम करते. या नियमांचं पालन करणं हे सर्व बँकांसाठी आवश्यक आहे.
 Reserve Bank of India Imposed Fine
Reserve Bank of India Imposed FineSaam Tv
Published On

Reserve Bank of India Imposed Fine:

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशभरातील सर्व बँकांवर लक्ष ठेवण्याचं आणि नियम बनवण्याचं काम करते. या नियमांचं पालन करणं हे सर्व बँकांसाठी आवश्यक आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते.

यातच रिझर्व्ह बँकेने मोठे पाऊल उचलत देशातील 5 बँकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. कोणत्या बँकांना किती दंड ठोठावण्यात आला आहे आणि त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया? ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Reserve Bank of India Imposed Fine
Redmi Note 13 Pro 5G भारतात लॉन्च, 200MP कॅमेरासह हे 7 key फीचर्स या बजेट फोनला बनवतात खास

या बँकांना ठोठावण्यात आला दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक (The Co-operative Urban Bank), द संखेडा नागरी सहकारी बँक (The Sankheda Nagarik Co-operative Bank), श्री भारत को-ऑपरेटिव्ह बँक (Shri Bharat Co-operative Bank), द भू कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक (The Bhu Commercial Co-operative Bank) आणि लिमडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला (The Limdi Urban Co-operative Bank) दंड ठोठावला आहे. मात्र या सर्व बँकांना वेगवेगळे दंड ठोठावण्यात आले आहेत. आरबीआयने या 5 बँकांना 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.  (Latest Marathi News)

कोणत्या बँकेला किती दंड ठोठावण्यात आला?

भारतीय रिझर्व्ह बँकेने लिमडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर द भू कमर्शियल को-ऑपरेटिव्ह आणि द को-ऑपरेटिव्ह अर्बन यांना दीड लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर श्री भारत सहकारी बँक आणि संखेडा नागरीक सहकारी बँकेला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 Reserve Bank of India Imposed Fine
Gold Or Share Investment: सोनं की शेअर बाजार? नवीन वर्षात कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर? वाचा सविस्तर

का ठोठावण्यात आला दंड?

भारतीय रिझर्व्ह बँकेने को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, संखेडा नागरीक सहकारी बँक, श्री भारत सहकारी बँक, द भू कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक आणि द को-ऑपरेटिव्ह बँक, लिमडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांना नियमांचे पालन न केल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे.

ग्राहकांवर काय होणार परिणाम?

आरबीआयच्या या निर्णयाचा संबंधित बँकांच्या ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याचे उत्तर असे आहे की, आरबीआयच्या या कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. जर तुम्ही या बँकांचे ग्राहक असाल तर, या बँका तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा पैसा वसूल करू शकत नाहीत. बँकेने असे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत तुम्हाला तक्रार करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com