Redmi Note 13 Pro 5G भारतात लॉन्च, 200MP कॅमेरासह हे 7 key फीचर्स या बजेट फोनला बनवतात खास

Redmi Note 13 Pro 5G News: आघाडीची चिनी मोबाइल उत्पादक कंपनी Xiaomi ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 13 Pro 5G भारतात लॉन्च केला आहे. या मिड रेंज स्मार्टफोन आहे.
Redmi Note 13 Pro 5G launched in India
Redmi Note 13 Pro 5G launched in IndiaSaam Tv
Published On

Redmi Note 13 Pro 5G launched in India:

आघाडीची चिनी मोबाइल उत्पादक कंपनी Xiaomi ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 13 Pro 5G भारतात लॉन्च केला आहे. या मिड रेंज स्मार्टफोन आहे. Redmi Note सीसीरिजची भारतीय ग्राहकांमध्ये एक वेगळीच क्रेज आहे. याआधी ही कंपनीच्या या सीरीजमधील फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला होता. यातच या नवीन फोनमध्ये कंपनीने काय दिलं आहे खास? हेच जाणून घेऊ...

डिस्प्ले (Display)

Redmi Note 13 Pro 5G मध्ये 1.5K (2712 x 1220) च्या रिझोल्यूशनसह 6.67 AMOLED डिस्प्ले मिळतो. ही स्क्रीन-टू-बॉडी रेशो 94 टक्के देते. हा फोन 120Hz चा आणि 30Hz ते 120Hz रिफ्रेश रेट पर्यंतसह येतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Redmi Note 13 Pro 5G launched in India
Amazon Flipkart Offers: 50MP कॅमेरा, 5000 mAh ची दमदार बॅटरी; 7000 पेक्षा कमी किंमतीत Redmi चा हा फोन खरेदी करण्याची संधी

कॅमेरा (Camera)

हा फोन 200MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. Redmi Note 13 च्या कॅमेराने जबरदस्त फोटो क्लिक करता येतील, असा दावा कंपनीने केला आहे. पिक्सेल बिनिंग सपोर्टसह 200MP प्रायमरी सेन्सर आणि लो लाईट फोटोग्राफीसाठी 16-इन-1 शूटिंग मोड सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत. न-सेन्सर झूम, नाईट मोड आणि 30fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग यासारखी फीचर्सही यात देण्यात आले आहेत. याशिवाय यात 16MP फ्रंट कॅमेरामध्ये AI ब्युटीफाय मोड, नाईट मोड आणि स्लो-मोशन सारखे फीचर ग्राहकांना मिळतील.  (Latest Marathi News)

परफॉर्मन्स (Performance)

Redmi Note 13 Pro स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 मोबाइल प्लॅटफॉर्मद्वारे समर्थित आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात 4nm प्रोसेसर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Redmi Note 13 Pro 5G launched in India
Samsung च्या तीन 5G स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर, 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

हा फोन 8GB - 12GB LPDDR4X RAM आणि 256GB स्टोरेज सपोर्टसह येतो. यात गेमिंग आणि मल्टीटास्किंग दोन्हीसाठी Adreno GPU A710 देखील आहे.

बॅटरी आणि चार्जिंग (Battery and Charging)

या फोनमध्ये 5100mAh (typ) Li-ion पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. जी 67W टर्बो चार्जला सपोर्ट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com