Amazon Flipkart Offers: 50MP कॅमेरा, 5000 mAh ची दमदार बॅटरी; 7000 पेक्षा कमी किंमतीत Redmi चा हा फोन खरेदी करण्याची संधी

Redmi Smartphone: आघाडीची चीनी स्मार्टफोन कंपनी रेडमी सतत एकामागून एक फोन लॉन्च करत आहे. आज कंपनीने Redmi ची Note 13 सीरीज लॉन्च केली आहे. यातच रेडमीचा बजेट स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वर अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे.
Redmi Smartphone Discount Offers
Redmi Smartphone Discount OffersSaam Tv
Published On

Redmi Smartphone Discount Offers:

आघाडीची चीनी स्मार्टफोन कंपनी रेडमी सतत एकामागून एक फोन लॉन्च करत आहे. आज कंपनीने Redmi ची Note 13 सीरीज लॉन्च केली आहे. यातच रेडमीचा बजेट स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वर अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. जर तुम्ही नवीन बजेट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डील तुमच्यासाठी चांगली ठरू शकते आहे. 50MP कॅमेरा असलेल्या या फोनवर तुम्हाला किती रुपयांची सूट मिळत आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Redmi 12C वर मिळत आहे जबरदस्त सूट

आम्ही ज्या फोनबद्दल तुम्हाला सांगत आहोत तो आहे Redmi 12C. हा फोन फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन दोन्हीवर 6,999 रुपयांना विकला जात आहे. हा फोन 9,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. सध्या या फोनची किंमत 13,999 रुपये आहे. अशातच जर फोनची सध्याची किंमतीनुसार पाहिलं तर तुम्ही यावेळी हा फोन अर्ध्या किमतीत खरेदी करू शकाल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Redmi Smartphone Discount Offers
Samsung च्या तीन 5G स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर, 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

यासोबतच फ्लिपकार्टवरून अॅक्सिस बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 5,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. त्यानंतर फोनची किंमत आणखी कमी होईल. (Latest Marathi News)

Redmi 12C फीचर्स

हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 4 जीबी रॅम आहे, जी व्हर्च्युअल रॅमद्वारे 3 जीबीपर्यंत वाढवता येते. यासोबत 64 GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50 MP मेन बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. (smartphone under 8000 flipkart)

Redmi Smartphone Discount Offers
Toyota ची ही SUV महागली, कंपनीने किंमतीत तब्बल इतक्या हजारांची केली वाढ

यामध्ये पोर्ट्रेट मोड आणि नाईट मोड देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे. जी 10W चार्जरसह येते. फोनमध्ये HD+ डिस्प्ले आहे. हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. (smartphone under 8000 amazon)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com