Gold Or Share Investment: सोनं की शेअर बाजार? नवीन वर्षात कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर? वाचा सविस्तर

Investment: नवीन वर्षात गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि कुठे गुंतवणूक करायची या संभ्रमात असाल तर सोने आणि शेअर बाजार हे दोन उत्तम पर्याय आहेत. दोन्हीमध्ये गुंतवणूक करुन चांगला नफा कमावला जाऊ शकतो.
Gold Or Share
Gold Or ShareSaam Tv
Published On

Investment Tips For 2024:

नवीन वर्षात गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि कुठे गुंतवणूक करायची या संभ्रमात असाल तर सोने आणि शेअर बाजार हे दोन उत्तम पर्याय आहेत. दोन्हीमध्ये गुंतवणूक करुन चांगला नफा कमावला जाऊ शकतो. मात्र दोन्ही गुंतवणुकीत फरक आहे. सोने गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो, तर शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची मानली जाते. त्यामुळे दोघापैकी कशात गुंतवणूक फायदेशीर ठरु शकेल, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (Latest News)

२०२३ मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचा खूप चांगला फायदा झाला होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल १६ टक्के परतावा मिळाला होता. तसेच सोन्यात गुंतवणूक केल्यासदेखील चांगला फायदा होतो. मागील वर्षात सोने गुंतवणुकीवर १५ टक्के परतावा मिळाला होता. २०२४ मध्ये शेअर बाजार आणि सोन्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

शेअर्स

२०२४ मध्ये शेअर बाजाराच्या किंमतीत वाढ होऊ शकते. २०२४ च्या अखेरीस सेनसेक्स (Sensex)८३,२५० चा आकडा पार करु शकतो. तर निफ्टी (Nifty) २५,००० आकडा पार करु शकतो. मंगळवारी सेनसेक्स ७१,४३४ वर बंद झाला. त्यामुळे २०१४ मध्ये सेनसेक्स तब्बल १२ हजार अंकांनी वाढला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरूवातीलाच तब्बल १४.४१ टक्के परतावा मिळाला आहे. या वर्षी १४ टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता आहे.

Gold Or Share
Tata Punch EV: एका चार्जमध्ये संपूर्ण मुंबईत ५ दिवस धावणार; २१ हजारात करा बुकिंग, टाटाची नवी कोरी कार

सोने गुंतवणूक

जागतिक बाजारपेठेत २०१४ मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्याता आहे. २०२३ मध्ये सोन्याची किंमत ६३,२०३ होती. सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना १४.८८ टक्के परतावा मिळाला होता. २०२४ मध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. हा आकडा वर्षाअखेरीस ७२ हजारापर्यंत जाऊ शकतो.

Gold Or Share
Kisan Credit Card Benefits : शेतकऱ्यांना सहज मिळणार लाखोंचं कर्ज, केंद्र सरकारची खास योजना; कसा कराल अर्ज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com