Tata Punch EV: एका चार्जमध्ये संपूर्ण मुंबईत ५ दिवस धावणार; २१ हजारात करा बुकिंग, टाटाची नवी कोरी कार

Tata Punch Electric Revealed: ही रक्कम भरून तुम्ही आजच तुमची कार रिजर्व करू शकता. कार बूक करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा डिलरशीपच्या दुकानांना भेट देऊ शकता.
Tata Punch EV
Tata Punch EVSaam TV
Published On

Tata Punch:

टाटा मोटर्स कंपनीच्या कार किंवा अन्य गाड्या सर्वांनाच आवडतात. अनेक तरुणांची ही फेवरेट कंपनी आहे. अशात आपल्या ग्राहकांसाठी टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक पंच एसयूवी लॉन्च केली आहे. तसेच acti.ev आर्किटेक्चर देखील लॉन्च केले आहे. पंच कारमध्ये पहिल्यांदाच ही इलेक्ट्रॉनीक कार लॉन्च केलीये. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फक्त २१,००० रुपयांना मिळतेय कार

Punch.ev बूक करण्यासाठी तुमच्या खिशात अवघे २१००० रुपये असले तरी पुरेसे आहेत. कारण २१००० हजारांपासून याचे बुकींग आजपासून सुरू झाले आहे. ही रक्कम भरून तुम्ही आजच तुमची कार रिजर्व करू शकता. कार बुक करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा डिलरशीपच्या दुकानांना भेट देऊ शकता.

acti.ev अंतर्गत तयार केलेल्या पंच EV मध्ये 4 महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये पॉवरट्रेन, चेसिस आणि क्लाउड आर्किटेक्चर, इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर यांचा समावेश आहे. टाटा पंच इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक खास गोष्टी आहेत. त्याबाबतची सर्व माहिती पुढे दिली आहे.

उत्तम बॅटरी

acti.ev प्लॅटफॉर्मवर बनलेल्या या कारसाठी बॅटरीचे विविध ऑप्शन उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक पंच ही कार ३०० ते ६०० किलोमीटरपर्यंत ताशी वेगाने धावते. कारला चार्ज करताना ७.२kW पासून ११kW पर्यंत असलेल्या ACचार्जिंग बोर्डचा तुम्ही वापरू शकता. फक्त १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये टाटा पंच कार १०० किलोमीटरपर्यंत धावते. या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

Tata Punch EV
Bike Fire At Petrol Pump: पेट्रोल पंपावर बाईकने घेतला पेट, क्षणात आग भडकली; नागरिकांची पळापळा, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com