Kisan Credit Card Benefits : शेतकऱ्यांना सहज मिळणार लाखोंचं कर्ज, केंद्र सरकारची खास योजना; कसा कराल अर्ज?

Kisan Credit Card Scheme : किसान क्रेडिट कार्ड योजनेत शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा पशुसंवर्धनाशी संबंधित लोकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. या अंतर्गत त्यांना फक्त 2 लाख रुपयांचे कर्ज मिळते.
Kisan Credit Card
Kisan Credit CardSaam Tv
Published On

Kisan Credit Card :

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अनेकदा व्याजाने पैसे उभे करावे लागतात. मात्र अडचणीचा गैरफायदा घेत जास्त व्याजदराने अनेकजण शेतकऱ्यांना पैसे देत होते. यामुळे शेतकरी अडचणीत येत होता. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड सुविधा आणली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किसान क्रेडिट कार्डच्या (KCC) मदतीने गरज भासल्यास शेतकरी या कार्डवरून कर्ज घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी वेळेवर पैसे भरल्यास या कर्जावरील व्याजदरही कमी राहतो. शेतीसाठी इतके स्वस्त कर्ज इतर कोणत्याही योजनेत उपलब्ध नाही. केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी मोहीम राबवत आहे. ज्या अंतर्गत कोट्यवधी कर्जाचं वाटप करण्यात आले आहेत.

Kisan Credit Card
Debit-Credit कार्डवर असणारा CVV आणि CVC नेहमी सिक्रेट ठेवायला का सांगतात? त्याचे कारण काय?

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजावर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या योजनेत शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा पशुसंवर्धनाशी संबंधित लोकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. या अंतर्गत त्यांना फक्त 2 लाख रुपयांचे कर्ज मिळते. यातील 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध आहे.

Kisan Credit Card
PM Kusum Yojana : शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार, सरकारी योजनेचे फायदे जाणून घ्या

किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

KCCसाठी भरलेला अर्ज

ओळखपत्र (पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)

पत्ता पुरावा (पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)

जमिनीची कागदपत्रे

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक इतर काही कागदपत्रेही मागू शकते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com