PM Kusum Yojana : शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होणार, सरकारी योजनेचे फायदे जाणून घ्या

Government Scheme: सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम कुसुम योजना राबवल्या आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
Government Scheme For Farmers
Government Scheme For FarmersSaam Tv
Published On

PM Kusum Yojana Benefits :

नागरिकांच्या हितासाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. त्यात अनेक योजना महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी , शेतकऱ्यांसाठी असतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजना कुसुम योजना राबवल्या आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत. या योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. (Latest News)

पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी सरकारकडून सबसिडी दिली जाणार आहे. ही सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकार देणार आहे. प्रत्येक राज्यासाठी याचे काही वेगळे नियम आहेत. या योजनेअंतर्गत, सोरपंपाचा वापर करुन शेतकरी (Farmer) आता चांगले उत्पादन घेऊ शकणार आहेत.

सोलर पंपचे महत्त्व

सोलार पंप लावण्यासाठी ४ ते ५ एकर जमिनीची आवश्यकता असते. या जमिनित सोरपंपाचा वापर केल्याने एका वर्षाक १५ लाख युनिट वीज निर्माण केली जाऊ शकते. या वीजनिर्मितीमुळे शेतकरी चांगली कमाई करु शकतात.

Government Scheme For Farmers
Investment Tips: फक्त ३० रुपयांच्या सेविंगने व्हाल करोडपती; मालामाल होण्याचा सिंपल फंडा

सबसिडी किती असेल?

या योजनेअंतर्गात केंद्र सरकार शेतकऱ्यांना ४५ टक्के सबसिडी देते. तर प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी सबसिडी देते. हरियाणा सरकार या योजनेअंतर्गत ३० टक्के सबसिडी देते. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

या योजनेअंतर्गात सोलार पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे सादर करावी लागतील. यासाठी शेतकऱ्यांना आधारकार्ड, रेशनकार्ज, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि जमिनिच्या कागदपत्राची एक प्रत्र सादर करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या त्यांच्या राज्यातील शेतकरी पोर्टलला भेट देऊन अर्ज करु शकतात.

Edited By: Siddhi Hande

Government Scheme For Farmers
Loan Fraud: तुमच्या नावावर दुसऱ्याने कर्ज घेतलंय का? लोन न घेता तुम्ही कर्जबाजारी आहात? अशाप्रकारे करा चेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com