Dombivli MIDC Blast SaamTv
मुंबई/पुणे

Dombivli Blast Update: डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या फरार मालकाला अटक; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Dombivli MIDC Fire Update: डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या फरार मालकाला अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

Vishal Gangurde

तबरेज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : डोंबिवली कंपनी स्फोट प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या फरार मालक मालती मेहताला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. या स्फोटाची इतकी भीषण होती की, या घटनास्थळी दोन ते तीन कंपन्यांनाही आग लागली. या आगीच्या भीषण दुर्घेटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर पोलिसांकडून स्फोट झालेल्या अमुदान कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह इतर संचालक व्यवस्थापक आणि देखरेख अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर कंपनीचे मालक फरार होते.

अमुदान कंपनीचे मालक फरार झाल्यानंतर नाशिकला पळाले होते. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची त्यांच्यावर नजर होती. त्यानंतर आज शुक्रवारी पोलीस कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहताला अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस निरीक्षक मधुकर कड काय म्हणाले?

या मोठ्या कारवाई केल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माध्यमांशी संवाद याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक मधुकर कड म्हणाले, 'डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्पोटातील मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीपासून नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई केली.

'तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता नाशिकमध्ये आली होती. नाशिकमध्ये दाखल नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता, असेही पोलस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Kitchen Hacks: कांद्यावर काळे डाग येऊ नये म्हणून करा हे सोपे उपाय

Famous Actress : मुलीसाठी बापाने हद्द पार केली; लोकप्रिय अभिनेत्रीचं केलं अपहरण, धमकी दिली अन्..., वाचा नेमकं प्रकरण

LIC Vima Sakhi : LIC ची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००, अट फक्त १०वी पास

Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

SCROLL FOR NEXT