Manmad News : बँक प्रतिनिधीकडून १ कोटींचा अपहार; रक्कम काढण्यासाठी खातेदारांची बँकेत गर्दी

Nashik News : दोन दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकृत प्रतिनिधीने बनावट शिक्के व सर्टिफिकेट देऊन गुंतवणूकदारांचा १ कोटी ३९ लाख इतक्या रक्कमेचा अपहार केला आहे
Manmad News
Manmad NewsSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मनमाडच्या युनियन बँकेत विमा प्रतीनिधी असल्याचे सांगत अनेकांची युनियन बँकेत मुदत पुर्व ठेवी गोळा केल्या. त्याच्या नुतनीकरणासाठी दिलेल्या रकमेचा १ करोड ३९ लाख रुपयाचा अपहार केल्याची घटना उघडीस आली. यानंतर बँकेच्या खातेदारांनी आपल्या ठेवीच्या रक्कम काढण्यासाठी बँकेत गर्दी केली आहे. यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती आहे. 

Manmad News
Fake Note : धडगाव परिसरात ५०० च्या बनावट नोटा; नकली नोट चलनात आणणारी टोळी सक्रिय 

युनियन बँकेच्या मनमाड (Manmad) शाखेत दोन दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकृत प्रतिनिधीने बनावट शिक्के व सर्टिफिकेट देऊन गुंतवणूकदारांचा १ कोटी ३९ लाख इतक्या रक्कमेचा अपहार केला आहे. बँकेत येणाऱ्या शाखा धारकांना विमा विक्री अधिकारी असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम वसूल केली. मात्र ती रक्कम त्यांच्या खात्यात न भरता या सगळ्या रकमेचा अपहार केला; अशी तक्रार बँकेच्या अधिकाऱ्याने दाखल केली. या प्रकरणी संदीप देशमुख विरोधात मनमाड पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला. 

Manmad News
Jintur Water Shortage : जिंतूरमध्ये पाणीबाणी; येलदरी धरणात २८ टक्केच पाणी साठा

बँकेबाहेर गोंधळ 

दरम्यान बँकेत (Bank) अपहार झाल्याच्या वृतामुळे खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे खातेदारांनी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी केली आहे. मनमाड शहरातील युनियन बँकेत खातेदारांची मोठी गर्दी केली असून गर्दी झाल्याने कोणालाच आत सोडले जात नसल्याने बँकेच्या बाहेर गोंधळ निर्माण झाला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com