Fake Note : धडगाव परिसरात ५०० च्या बनावट नोटा; नकली नोट चलनात आणणारी टोळी सक्रिय 

Nandurbar News : धडगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर ५०० रुपयांची बनावट नोट आढळली. त्या नोटांची पुन्हा पडताळणी केली. मात्र, त्यातून त्या बनावटच असल्याचे आढळून आले
Fake Note
Fake NoteSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यांच्या सीमा वरती भागावर असलेल्या धडगाव शहरातील बाजारपेठेत ५००  रुपयांच्‍या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्‍या आहेत. यामुळे व्‍यापारी आणि ग्राहकांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्‍या काही दिवसांत अनेक ठिकाणी पाचशेच्‍या बनावट नोटा चलनात आल्‍याचे निदर्शनास आले आहेत. या रॅकेटचा तपास करून कारवाईची मागणी केली जातं आहे.

Fake Note
Nandurbar News : रोजगाराच्या शोधात मजुरांचे गुजरातमध्ये स्थलांतर; मुलांच्या शिक्षणाचेही होतेय नुकसान

धडगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर ५०० रुपयांची बनावट नोट आढळली. त्या नोटांची पुन्हा पडताळणी केली. मात्र, त्यातून त्या बनावटच असल्याचे आढळून आले. असाच प्रकार कायम घडत असल्याचे (Nandurbar) संबंधितांनी सांगितले. कोणाकडून तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात बँकेत भरणा करताना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. 

Fake Note
Sambhajinagar Water Supply : अखेर हर्सूलच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा; जुन्या शहरातील पाणी प्रश्न मिटला

बनावट नोटा चालविणारी टोळी 

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट नोटा (Fake Notes) आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु आर्थिक नुकसान व चौकशीचा ससेमीरा टाळण्यासाठी फसगत झालेले नागरिक तक्रार करण्यास धजत नाही. यातच फसवणूक करणाऱ्यांचे फावते आहे. या बनावट नोटा वापरणारी टोळी धडगाव आणि मोलगी या आदिवासी बहुल परिसरात फिरत आहे. सुटे पैसे मागण्याचा बनाव करून खोटी नोट देऊन व्यापाऱ्यांना फसवले जात आहे. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे अपटूडेट पोशाख असलेले हे लोक बाजारात बनावट नोटा चालवत आहेत. बनावट नोटांमध्ये पाचशेच्या नोटांचा समावेश आहे. आठवळे बाजारामध्ये या नोटा बाजारात आणणारी टोळी फिरते; असा संशय व्यक्त होत आहे. (Police) पोलिस यंत्रणेने या गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बनावट नोट मिळाल्‍यास काय करावे?
एखाद्या व्‍यवहारातून आपल्‍याकडे जर एखादी संशयास्‍पद नोट आली, तर सर्वप्रथम बँकेत जाऊन मशीनद्वारे त्‍याची सत्‍यता पडताळून पहावी. नोट बनावट निघाल्‍यास स्‍थानिक पोलीस ठाण्‍यात जाऊन यासंदर्भात तक्रार करावी. रिझर्व बँकेच्‍या नियमानुसार बँकेच्‍या निदर्शनास तुम्‍ही संबंधित नोट आणून दिल्‍यास त्‍या बदल्‍यात त्‍याच मूल्‍याचे पैसे तुम्‍हाला दिले जात नाहीत. बनावट नोट व्‍यवहारात आणणे किंवा ती फिरवणे हा गुन्‍हा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com