Sambhajinagar Water Supply : अखेर हर्सूलच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा; जुन्या शहरातील पाणी प्रश्न मिटला

Sambhajinagar News : हर्सूल तलावातील जलसाठा दोन ते तीन टक्क्यावर आल्याने मागील एक आठवडाभरापासून त्यातून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला होता.
Sambhajinagar Water
Sambhajinagar WaterSaam tv
Published On

रामू ढाकणे  

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील १४ वार्डांना पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावाने तळ गाठला आहे. केवळ अडीच फूट पाणी या तलावात राहिले असल्याने या भागात पाणी पुरवठा करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तलावातील मृत साठ्यातून उपसा करण्यास सुरवात करण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटला आहे. 

Sambhajinagar Water
Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँक अपहाराचे ४० लाख रुपये वसूल; तासगाव शाखेत बँक कर्मचाऱ्यानेच मारला होता डल्ला

हर्सूल तलावातील (Sambhajinagar) जलसाठा दोन ते तीन टक्क्यावर आल्याने मागील एक आठवडाभरापासून त्यातून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला होता. हा उपसा बंद झाल्याने हर्सूलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरातील १४ वार्डांचा भार (Jayakwadi Dam) जायकवाडीतून येणाऱ्या पाण्यावर पडला होता. त्यामुळे शहरातील अन्य वसाहतीमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली होती. दरम्यान आता तलावाच्या मृत साठ्यातून उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Sambhajinagar Water
Nandurbar News : रोजगाराच्या शोधात मजुरांचे गुजरातमध्ये स्थलांतर; मुलांच्या शिक्षणाचेही होतेय नुकसान

जनरेटर बसवून पंप सुरु 

संभाजीनगर महापालिका पाणी पुरवठा (Water Supply) विभागाने हर्सूल तलावातील मृत जलसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू करण्यासाठी जनरेटर बसवून पंप सुरू केले. त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या १४ वार्डाचा पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. शिवाय जयकवाडीमधून होत असलेल्या पाणी पुरवठ्यावरील भर देखील कमी झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com