Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँक अपहाराचे ४० लाख रुपये वसूल; तासगाव शाखेत बँक कर्मचाऱ्यानेच मारला होता डल्ला

Sangli News : सांगली जिल्हा बँकेच्या तासगावमधील मार्केट यार्ड शाखा आहे. या शाखेतील दुष्काळी निधीवर तेथील कर्मचारी योगेश वजरीनकरने अपहार केला.
Sangli DCC Bank
Sangli DCC BankSaam tv

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेमधील शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ५६.३३ लाख रकमेवर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच डल्ला मारला होता. या प्रकरणात निलंबित कर्मचारी योगेश वजरीनकर यांनी ४० लाख रुपये बँकेत जमा केले आहेत. अपहारातील १०० टक्के रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत.

Sangli DCC Bank
Beed Weather: बीडमध्ये पुढील चार दिवस उष्णतेची लाट; तापमान पोहचले ४३ अंशावर

सांगली (Sangli) जिल्हा बँकेच्या तासगावमधील मार्केट यार्ड शाखा आहे. या शाखेतील दुष्काळी निधीवर तेथील कर्मचारी योगेश वजरीनकरने अपहार केला. त्याचा सहकारी निमणी (ता. तासगाव) शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदतीत २१ लाख रुपयांचा अपहार (Scam) केला होता. याप्रकरणी जबाबदार धरून प्रमोद कुंभार, तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम. व्ही. हिले आणि लिपिक योगेश वजरीनकर यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर जिल्हा बँक प्रशासनाने केवळ दोनच दिवसात ४० लाख रुपये वसूल केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Sangli DCC Bank
Kalyan Crime : सामान उधार न दिल्याने वाद; मध्यस्थी करणाऱ्या दुकानदाराच्या भावावर केला शस्त्राने वार

सर्व शाखांची होणार तपासणी 
संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व शाखांची तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाभरात सहा पथके स्थापन केली आहेत. पथकामध्ये ४८ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांना २१ मे रोजी जिल्हा (Bank) बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. संबंधित पथकाकडून येत्या पाच ते सहा दिवसांत तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com