Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv

Kalyan Crime : सामान उधार न दिल्याने वाद; मध्यस्थी करणाऱ्या दुकानदाराच्या भावावर केला शस्त्राने वार

Kalyan News : नीतेशने त्याच्याकडे यापूर्वी नेलेल्या किराणा सामानाचे पैसे दे, मग यापुढचे सामान घेऊन जा असे सांगितले
Published on

अभिजित देशमुख 
कल्याण
: किराणा दुकानात माल घेण्यासाठी आला असता सामान उधारीत देणार नाही पैसे दे; असे दुकानदाराने सांगितल्याचा राग आल्याने तरुणाने दुकानदारास मारहाण केली. याबाबत पोलीसात तक्रार केली असता या तरुणाने दुकानदाराला शिवीगाळ केली. मध्यस्थी करण्यास आलेल्या दुकानदाराच्या भावावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan Crime
Jalgaon Cyber Crime : ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी; डॉक्टराची १९ लाखांत फसवणूक

कल्याण (Kalyan) पश्चिम काळा तलाव परिसरात नितेश काळे व त्याचा भाऊ पंकज व कुटुंबासह राहतात. नितेश यांचे याच परिसरात किराणा दुकान आहे. तर त्याचा भाऊ पंकज हा गोल्डन पार्क येथील फिटनेस प्रोफेसी जीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतो. नितेश यांच्या दुकानातून ठाणकरपाडा येथे राहणारा राकेश पवार हा उधारीने किराणा सामान नेत असतो. दरम्यान शनिवारी रात्री दहाच्या सुमारास राकेश पवार नीतेशच्या दुकानात उधारीने किराणा सामान नेण्यासाठी आला. मात्र नीतेशने (Crime News) त्याच्याकडे यापूर्वी नेलेल्या किराणा सामानाचे पैसे दे, मग यापुढचे सामान घेऊन जा असे सांगितले. 

Kalyan Crime
Beed Weather: बीडमध्ये पुढील चार दिवस उष्णतेची लाट; तापमान पोहचले ४३ अंशावर

पैसे मागितल्याने राकेशला राग आला. यावरून त्याने शिवीगाळ करत बुक्क्याने नितेशला बेदम मारहाण केली. यानंतर नीतेशने बाजारपेठ (Police) पोलीस ठाण्यात राकेश विरुध्द तक्रार केली. याची माहिती मिळताच संतापलेल्या राकेश नितेशच्या किराणा दुकानाजवळ येऊन पोलीस ठाण्यात तक्रार का केली? असा जाब विचारत दमदाटी करू लागला. यावेळी नितेशने भाऊ पंंकजला बोलावून घेतले. यावेळी पंकज राकेशला समजविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पंकज आणि राकेश यांच्यात बोलणे सुरू असताना राकेशने खिशातून चाकू काढत पंकजवर हल्ला केला. यानंतर राकेश तेथून पसार झाला. जखमी पंकजला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस राकेशचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com