Jintur Water Shortage : जिंतूरमध्ये पाणीबाणी; येलदरी धरणात २८ टक्केच पाणी साठा

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणातून परभणी शहरासह जिंतूरला पाणी पुरवठा होतो. पण धरणात कमी पाणी असल्याने व सततच्या तांत्रिक बिघाडामुळे जिंतूर शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी येते
Jintur Water Shortage
Jintur Water ShortageSaam tv
Published On

परभणी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात सद्य:स्थितीत २८ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. धरणात पाणी कमी असले तरी नागरिकांनी तहान भागेल इतका पाणीसाठा धरणात आहे. मात्र तांत्रिक कारणांमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या जिंतूरमध्ये पाहण्यास मिळत आहे.   

Jintur Water Shortage
Sambhajinagar Water Supply : अखेर हर्सूलच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा; जुन्या शहरातील पाणी प्रश्न मिटला

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील येलदरी धरणातून परभणी शहरासह जिंतूरला पाणी पुरवठा होतो. पण धरणात कमी पाणी असल्याने व सततच्या तांत्रिक बिघाडामुळे जिंतूर शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी येते. तर ह्याच (Yeldari dam) धरणातून परभणी शहराला पाणी पुरवठा कमी दाबाने होतो. कधी विजेची समस्या तर कधी मोटार बिघाड व प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे धरणात पाणी असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

Jintur Water Shortage
Fake Note : धडगाव परिसरात ५०० च्या बनावट नोटा; नकली नोट चलनात आणणारी टोळी सक्रिय 

विहिरी कोरड्या 

जिंतूर (Jintur) तालुक्यातील ब्राम्हणगाव, चारठाणा, कोसडी, बोरी झरी येथे बोर, विहरी आटल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. टँकरने कोरड्या विहरीत पाणी टाकून ग्रामस्थांना पाणी घ्यावे लागत आहे. सद्यस्थितीत जिंतूर शहराला तर तालुक्यात पन्नास टँकरने पाणी देण्यात येत असून भविष्य काळात पाऊस पडला नाही. तर भीषण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com