Duplicate Maggi and Everest Masala: सुरत येथे बनावट एव्हरेस्ट व मॅगी मसाला निर्मिती; भिवंडीत विक्री करणाऱ्या दोघे मुद्देमालासह ताब्यात

Bhiwandi Latest News: बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली
Bhiwandi News: सुरत येथे बनावट एव्हरेस्ट व मॅगी मसाला निर्मिती; भिवंडीत विक्री करणाऱ्या दोघे मुद्देमालासह ताब्यात
Fake Maggi and Everest MasalaSaam TV

फय्याज शेख 

भिवंडी : भिवंडी शहरातील बाजारात बनावट एव्हरेस्ट व मॅगी मसाला विक्री केला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकरून बनावट मसाल्यांचे पाकीट हस्तगत केले आहेत. तसेच सुरत तयार करण्यात येत असलेल्या कंपनीला सील लावण्यात आले आहे. 

Bhiwandi News: सुरत येथे बनावट एव्हरेस्ट व मॅगी मसाला निर्मिती; भिवंडीत विक्री करणाऱ्या दोघे मुद्देमालासह ताब्यात
Jalna News : बोगस खते- बियाणे विकाल तर तुरुंगाची हवा; कृषी विभागासह जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

भिवंडी (Bhiwandi) शहरात एका टेम्पोमधून बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर तपास पथकाचे पोलीस (Police) उपनिरीक्षक सुरेश घुगे व पोलिस पथकाने जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा रचत कारवाई केली. त्या ठिकाणी जोगेश्वरी येथून आलेला संशयित टेम्पो थांबवून तपासणी केली. त्यामध्ये १ लाख ८ हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला, मटण मसाला व मॅगी मसाल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले.

Bhiwandi News: सुरत येथे बनावट एव्हरेस्ट व मॅगी मसाला निर्मिती; भिवंडीत विक्री करणाऱ्या दोघे मुद्देमालासह ताब्यात
Sambhajinagar News : टँकरने पाणी आणून जगवताहेत बागा; उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

सुरत येथे तयार होतो बनावट माल

टेम्पो चालक महेश लालताप्रसाद यादव व माल विक्रीसाठी आलेला मोहमद सलमान मोहमद अफजल प्रधान (दोघे रा. जोगेश्वरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे चौकशी केली असता हा बनावट पॅकिंग माल गुजरात (Gujrat) राज्यातील सुरत येथील फॅक्टरीमध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत विक्री केला जात असल्याचे सांगितले. यानंतर पोलिस पथकाने सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी, पर्वतगाव येथे छापा टाकला असता तेथे करण सुरेशभाई मेवाडा हा बनावट मसाला तयार करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथील कच्चा माल व मशीन, फॅक्टरी सिल करून कारवाई केली आहे. 

खऱ्या एव्हरेस्ट मसाले पाकिटावर ई हॉलमार्क असतो. परंतु बनावट पाकिटावर असा हॉलमार्क आढळून आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून एव्हरेस्ट कंपनीच्या सेल्समन यांनी दिलेल्या तक्रारीवरून या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी सुध्दा आपण वापरीत असलेले पॅक बंद खाद्य पदार्थ खरेदी करीत असताना त्याच्या खरेपणाची खात्री करून घ्यावा; असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com