Jalna News : बोगस खते- बियाणे विकाल तर तुरुंगाची हवा; कृषी विभागासह जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Jalna News : यंदाच्या खरीप हंगामात जालना जिल्ह्यामध्ये ६.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक खते आणि बियाणे उपलब्ध करण्यासाठी कृषी विभाग जोरदार प्रयत्न करत आहे
Jalna News
Jalna NewsSaam tv

रामू ढाकणे 
जालना
: खरीप हंगाम आता तोंडावर आहे. या हंगामाची तयारीला शेतकरी लागला असून बियाणे खरेदी देखील सुरु करण्यात आली आहे. दरम्यान काही विक्रेत्यांकडून बोगस बियाणे व खतांची विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असते. या प्रकारांना लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील सतर्क असून असा प्रकार आढळल्यास विक्रेत्याचा परवाना निलंबित करून त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.  

Jalna News
Jintur Water Shortage : जिंतूरमध्ये पाणीबाणी; येलदरी धरणात २८ टक्केच पाणी साठा

यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) जालना जिल्ह्यामध्ये ६.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक खते आणि बियाणे उपलब्ध करण्यासाठी कृषी विभाग जोरदार प्रयत्न करत आहे. मागील वर्षी बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा या (Bogus Seeds) बोगस विक्रीला लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी आदेश देखील काढले आहेत. 

Jalna News
Manmad News : बँक प्रतिनिधीकडून १ कोटींचा अपहार; रक्कम काढण्यासाठी खातेदारांची बँकेत गर्दी

यंदा जिल्हाभरामध्ये (Jalna) ६९ हजार ६०२ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असून कापूस बियाण्यांची १२.१७ लक्ष पाकिटे देखील उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच ६,६७० मॅट्रिक टन युरिया तर १४६० मॅट्रिक टन डी.ए.पी इतक्या खताचा बफर स्टॉक करण्यात येत आहे. दरम्यान कृत्रिम टंचाई निर्माण आणि बोगस खते, बियाणे विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल; असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com