Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: 'सात पिढ्या लक्षात राहतील अशी अद्दल घडवू', असं म्हणणाऱ्या पोलिस आयुक्तांना ७ आठवड्यात गुन्हेगारी रोखता आली नाही

Pune Crime News : "सात पिढ्यांना लक्षात राहील" असा इशारा देणाऱ्या पुणे पोलिस आयुक्तांनंतरही शहरात अल्पवयीन गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

  • पुण्यात मागील दीड वर्षात १२४ वाहन तोडफोडीच्या घटना; अनेक आरोपी अल्पवयीन

  • कोयता गँग व इतर टोळ्यांनी शहरात निर्माण केली भीतीची लाट

  • पोलिस आयुक्तांच्या धमकीनंतरही गुन्हेगारीत काहीच फरक नाही

  • कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; पुणेकरांमध्ये वाढलेली असुरक्षिततेची भावना

पुणे तिथे काय उणे? ही म्हण अगदी खरी आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गुंडांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. कधी कोणाची हत्या तर कधी कुठेतरी तोडफोडीच्या घटना सतत समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून पुणे शहरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही आठवड्यांपूर्वी गुन्हेगारांना इशारा दिला होता – “सात पिढ्यांना लक्षात राहील, अशी अद्दल घडवू.” मात्र प्रत्यक्षात मागील दीड महिन्याच्या काळात शहरात जो गुन्हेगारीचा उद्रेक झाला आहे, त्यावरून या इशाऱ्याचे प्रतिबिंब रस्त्यांवर कुठेच दिसून येत नाही. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर उजेडातही कोयत्यांचे हल्ले, वाहनांची तोडफोड, घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी पुणेकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.

पुण्यातील विविध भागांमध्ये या घटना इतक्या वाढल्या आहेत की, कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग आणि कोयता गँगसारख्या टोळ्यांची वाढती दहशत हे सर्वात चिंताजनक चित्र उभं करत आहे. शहरातील प्रमुख भागांमध्ये सलग रात्रींमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी, हडपसर, भवानी पेठ, धनकवडी, कात्रज या परिसरांमध्ये दररोज नवे गुन्हे घडताना दिसत आहेत. काही घटनांमध्ये थेट हवेत गोळीबार झाला, कोयत्याने वार करण्यात आले आणि तलवारी घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली.

गेल्या दीड वर्षांत पुण्यात 124 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या असून त्यातील 35 टक्के आरोपी अल्पवयीन आहेत. वर्षभरात ८९ प्रकरणे नोंद झाली असून, चालू वर्षातही ३५ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एमआयटी कॉलेज परिसर, हडपसर, कोंढवा आणि सदाशिव पेठ या ठिकाणी सातत्याने तोडफोड आणि हल्ल्याचे प्रकार घडले. काही घटनांमध्ये राजकीय नेत्यांचे नातेवाईक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचंही निष्पन्न झालं.

शहरात केवळ वाहन तोडफोडच नव्हे, तर चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील साडेचार वर्षांत तब्बल ४० कोटी २२ लाख रुपयांची वाहने चोरीला गेली, त्यापैकी केवळ १६ कोटींचीच वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं. घरफोड्यांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे – ७३ कोटींहून अधिक रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून केवळ १३ कोटींचा मुद्देमाल परत मिळवण्यात आला.

सामान्य पुणेकर या गुन्हेगारीचा थेट भुर्दंड सहन करत आहे. रात्रीचं पोलिसिंग अपुरं पडतंय, गुन्हेगारांची अरेरावी वाढतेय, आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी ते खुलेआम रस्त्यावर दहशत माजवत आहेत. 'भयमुक्त गणेशोत्सव'च्या ग्वाही दिल्या जात असल्या, तरी पुणेकरांच्या मनातील असुरक्षिततेचं सावट घनदाट होत चाललं आहे. पोलिसांनी काही प्रमाणात अटक व कारवाई केली असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, गुन्ह्यांचे बदलते स्वरूप आणि ठोस नियंत्रण यंत्रणेअभावी या घटनांना रोखता येत नाहीये. परिणामी, ‘पुणेकर भयमुक्त कधी होणार?’ हा सवाल दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.

दीड वर्षात १२४ घटनांची नोंद

शहरात वाहन तोडफोडीच्या दीड वर्षात तब्बल १२४ घटना घडल्या असून, त्यामध्ये गेल्या वर्षी (२०२४) ८९ घटना घडलेल्या आहेत. त्यातील ८१ गुन्हे उघड असून, २५५ आरोपी आहेत. तर अल्पवयीन ८७ मुलांचा सहभाग होता. तर चालू वर्षात ३५ घटनांत ८२ आरोपीपैकी ५० मुले अल्पवयीन आहेत.

  • २८ जून: चतुः शृंगी पोलिसांच्या हद्दीत विधाते वस्ती येथे १५ जणांचा धुडगूस.

  • २८ जून : सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे चौघांनी राडा घालून १५ वाहनांची तोडफोड केली.

  • ३ जुलै : पूना कॉलेज येथे निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर किरकोळ कारणावरून १० ते १५ जणांनी राडा घालून, एका तरुणाला धारदार हत्याराने मारहाण केली.

  • ५ जुलै : वानवडीत मध्यरात्री दोन गट भिडले. दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण.

  • १२ जुलै : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येऊन हातात कोयते आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एका तरुणावर हल्लाही केला.

  • २० जुलै : भवानी पेठ आणि कोंढवा येथे टोळक्याचा राडा.

  • २३ जुलै धनकवडी परिसरात गाड्यांची तोडफोड दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड

  • 4 ऑगस्ट किटकटवाडी या ठिकाणी गोळीबारानी पैठणी गाड्यांची तोडफोड

  • 5 ऑगस्ट दोन वाहन एकमेकांना वाचण्यावरून वाद; तरुणांकडून हवेत गोळीबार

  • 5 ऑगस्ट हडपसर भागात गाड्यांची तोडफोड, कोयते आणि तलवारीने वार

  • 6 ऑगस्ट पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठ भागात कोयत्याने वार गाड्यांची तोडफोड, राजकीय नेत्याच्या जावयाने गाड्यांची तोडफोड केली प्रकार

  • 7 ऑगस्ट एमआयटी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांचा राडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार या यांच्याकडून नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी

Rohit Pawar: रॅपिडोला धमकावले, कोट्यवधी घेतले; रोहित पवारांचा शिंदेंच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप

Income Tax Bill: मोदी सरकारनं मागे घेतलं इनकम टॅक्स २०२५ विधेयक; स्लॅबमध्ये बदल होणार?

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक समाजाची सरकारकडून फसवणूक; जरांगे पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधननंतर या राशींचं नशीब फुलणार, संपत्तीत होईल वाढ

SCROLL FOR NEXT