Pune Crime : पुण्यात खळबळ! वडील चिडले म्हणून १६ वर्षीय मुलानं आयुष्य संपवलं

Pune News : वडील रागावल्यामुळे एका अल्पवयीन मुलाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना पुण्यातील राजगड तालुक्यातील विंझर धनगरवस्तीत घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
pune shocking news
pune shocking newsx
Published On
Summary
  • पुण्यातून खळबळजनक घटना घडली आहे.

  • वडील रागावल्याने अल्पवयीन मुलाची आत्महत्या केली.

  • झाडाला गळफास घेत मुलाने स्वत:ला संपवले आहे.

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वडील रागावल्याने एका १६ वर्षीय मुलाने स्वत:चे जीवन संपवल्याचे उघडकीस आले आहे. झाडाला गळफास घेत मुलाने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील विंझर धनगरवस्तीमध्ये ही घटना ५ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे.

आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षीय मुलाचे नाव गणेश असे आहे. गणेशच्या वडिलांनी वेल्हे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, लहान मुलांमध्ये खेळू नको असे म्हणत ते गणेशला रागावले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन गणेशने स्वत:ला संपवले. घरात कोणी नसताना त्याने गोठ्याजवळील चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतला.

pune shocking news
Pune Crime : विकृतीचा कळस! पुण्यात तरुणाकडून मादी श्वानावर अत्याचार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

परिवारातील सदस्यांनी गणेशला झाडाला लटकलेले पाहिले. तो बराच वेळ हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर गणेशच्या वडिलांनी वेल्हे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गणेशला खाली उतरवून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

pune shocking news
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा हादरा, राज्यातील बडा नेता भाजपच्या वाटेवर

अशा घटना पालकांना सजग करणाऱ्या आहेत. मुलांचे वय, भावना आणि समज-गैरसमज यांचा विचार करून संवाद साधणे आवश्यक आहे. क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करणाऱ्या मुलांची संख्या वाढत असल्यामुळे समाज, शाळा आणि पालकांनी मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक आहे. असे मत घटनेनंतर मनोविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

pune shocking news
Actor Shot Dead : लोकप्रिय अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्या, पीडित महिलेच्या मदतीसाठी गेल्यानं गमावला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com