Pune Crime : विकृतीचा कळस! पुण्यात तरुणाकडून मादी श्वानावर अत्याचार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Pune Crime News : पुण्यात खळबळजनक प्रकार घटला आहे. मादी श्वानावर एका तरुणाकडून अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News
Pune Crime News Saam Tv
Published On
Summary
  • पुण्यात किळसवाणा प्रकार

  • मादी श्वानावर तरुणाकडून अत्याचार

  • घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

  • विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्याlतून एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील टिंगरेनगर भागात एका तरुणावर मादी श्वानावर अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. हा तरुण श्वानाला उचलून एका रुममध्ये घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या तरुणाच्या विरोधात २७ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून टिंगरे नगर भागातील मास्टर कॉलनी मध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहण्यास आहेत. होन्नापा अमोधीसिध्द होस्मानि या नावाचा एक व्यक्ती फिर्यादी यांच्या घरासमोर वास्तव्यास आहे. होन्नापा हा मिस्त्री असून ठिकठिकाणी तो बिगारी म्हणून काम करतो.

Pune Crime News
Maharashtra Politics : शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर! दोन जिल्हाप्रमुख भिडले, श्रेयवादावरुन हाणामारी अन् मोठा राडा

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ जुलै रोजी होन्नापाने फिरस्त्या कुत्र्याला कारण नसताना मारहाण करत होता. याबाबत फिर्यादी यांनी त्याला जाब विचारला असता त्याने त्यांच्याशी भांडण केले. ३ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांच्या आईने पाहिले की, होन्नापा हा एका फिरस्त्या कुत्र्याला उचलुन एका पत्र्याच्या रुममध्ये घेऊन गेला.

Pune Crime News
Maharashtra Politics : जो चुकीचा वागेल, त्याला मकोका लावू; बीडमध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य

फिर्यादी यांच्या आईने त्या पत्र्याचे रुमकडे गेले असता त्याने त्या कुत्रीला तिथून सोडून दिले. यावरुन संबंधित व्यक्ती हा मादी कुत्र्यावरती अत्याचार करून तिचा छळ करत असल्याचे दिसून आले. याअगोदर देखील त्या व्यक्तीने मादी कुत्र्यावर अत्याचार करुन त्याचा छळ केलेले असल्याचा संशय फिर्यादी यांना आहे.

Pune Crime News
Pune Ganeshotsav : पुण्यात पहिलाच प्रयोग! गणेश मंडळाकडून चक्क लेसर स्कॅनिंगने गणेशमूर्ती तयार

आरोपीने यापूर्वी बऱ्याच वेळा कारण नसताना भटक्या कुत्र्यांना मारहाण करुन क्रुरतेची वागणूक दिलेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तक्रारदार आणि ॲड रागिणी मोरे यांनी या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर विमानतळ पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News
Maharashtra Politics : शरद पवार गटाला धक्का! बडा नेता काँग्रेसमध्ये जाणार, पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com