Pune Ganeshotsav : पुण्यात पहिलाच प्रयोग! गणेश मंडळाकडून चक्क लेसर स्कॅनिंगने गणेशमूर्ती तयार

Pune News : पुणे शहरातील एका मंडळाने वायरलेस थ्रीडी स्कॅनिंगने गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच श्रींची मूर्ती साकार करण्यात आल्याचा दावा केली जात आहे.
Pune Ganeshotsav
Pune Ganeshotsavx
Published On
Summary
  • पुण्यातील पहिल्यांदाच 3D लेसर स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून गणेश मूर्ती साकारली.

  • वायरलेस स्कॅनिंग मशीनद्वारे मूळ मूर्तीचे अचूक स्कॅनिंग करून हुबेहुब मूर्ती तयार करण्यात आली आहे.

  • पर्यावरण रक्षणासाठी मूर्ती बायोडिग्रेडेबल प्लास्टिकने बनवण्यात आली आहे.

Pune : पुणे शहरातील गणेशोत्सवाची ख्याती ही फक्त राज्य किंवा देशापूर्ती मर्यादित नसून साता समुद्रात पार गेलेली आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या दहा दिवसाच्या कालावधीत येतात. तसंच गणेशोत्सव म्हटले की पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाकडून सुद्धा जयत तयारी केली जाते. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गणेश मंडळाकडून आता तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आपला बाप्पा सगळ्यांपेक्षा वेगळा कसा दिसेल हीच भावना मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे गणेश मंडळातील देखावे यावर अनेकांकडून भर दिला जातो तसेच बापाच्या मूर्तीवर आकर्षित असे काम करून त्याचं एक अनोखं रूप भाविकांसमोर येण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो.

यंदा सुद्धा पुण्यात वैभवशाली आणि ऐतिहासिक गणेशोत्सवाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. पुणे शहरातील श्री गुरुदत्त तरुण मंडळाकडून यंदा थ्री डी (3D) लेसर स्कॅनिंगचा वापर करून मूर्ती बनवण्यात आली आहे. मूळ मूर्तीचे थ्री डी स्कॅनिंग करून हुबेहुब बायोडिग्रेडेबल प्लास्टिक ची मूर्ती बनवण्याचा पहिलाच प्रयोग पुणे शहरात राबवण्यात आला. पुण्यातील इंद्रजीत जोशी यांनी त्यांच्याजवळ असलेल्या या एकमेव वायरलेस थ्री डी स्कॅनरने संपूर्ण मूर्तीचे स्कॅन करण्यात आले. या मशीनने मूळ मूर्तीवर असलेली अगदी बारीक बारीक नक्षीकाम सुद्धा टिपलं आणि त्यानंतर लेसर प्रिंटिंगच्या सहायाने दुसरी मूर्ती तयार केली. विशेष म्हणजे पर्यावरणाचा मुद्दा लक्षात घेता नवीन मूर्ती ही बायो डिग्रेडबल प्लास्टिकने साकारली गेली आहे. पुण्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच मूर्ती तयार करण्यात आली असल्याचा दावा जोशी यांनी केला आहे.

Pune Ganeshotsav
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधन होण्याआधी लाडक्या बहिणींना झटका? महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय

ज्या मशीनच्या सहाय्याने मूर्ती तयार करण्यात आली आहे त्याचे मालक इंद्रजीत जोशी म्हणाले, "पुणे शहरातील एकमेव अत्याधुनिक मशीन आहे. अनेक वर्षांपासून आपण जर पाहिलं तर एका गणेश मूर्तीची हुबेहूब मूर्ती बनवण्यासाठी कारागिरांना अनेक अडचणी येतात. यासाठी आम्ही ही लेदर मोड असलेली हायटेक स्कॅनर मशीन घेऊन आलो आहोत. मशीनला लावण्यात आलेला स्कॅनर हा आय आर मोडमध्ये कार्यान्वित आहे. ही मशीन मूर्तीवर असलेला पॉईंट डेटा गोळा करतो ज्यामध्ये मूर्तीवर असलेलं अगदी छोट्यातल्या छोट्या नक्षीकामसुद्धा ही मशीन गोळा करते."

Pune Ganeshotsav
Maharashtra Politics : शरद पवार गटाला धक्का! बडा नेता काँग्रेसमध्ये जाणार, पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

"मूळ मूर्ती वर असलेलं नक्षीकाम ही मशीन अचूकपणे टिपते आणि आउटपुट मध्ये अगदी तीन इंचापासून ते १८ इंचापर्यंत आपण मूर्ती बनवू शकतो. मूर्ती बनवताना पर्यावरणाला कुठलाही धोका होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. त्यामुळे मूळ मूर्ती ची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यासाठी आम्ही बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा वापर करतो. हा प्रयोग करणारच पुणे शहरातील गुरुदत्त मित्र मंडळ हे पहिलं गणेश मंडळ आहे," असं ही जोशी म्हणाले.

Pune Ganeshotsav
Maharashtra Politics : 'मी मंत्री होणार, मंत्री झालो नाहीतर...' ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मंडळाचे अध्यक्ष उदय महाले या तंत्रज्ञानाच्या वापरावर म्हणाले, "अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की मूळ मूर्ती सारखंच आपली घरातली मूर्ती सुद्धा असावी किंबहुना आपल्या गाडीमध्ये सुद्धा मंडळाचीच छोटी मूर्ती बसवण्यात यावी. मात्र तशी मूर्ती तयार करण्यात आली नाही. आता या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही मंडळाची मूळ मूर्ती जशी आहे अगदी तशी मूर्ती बनवू शकतो. यंदा थ्रीडी स्कॅनिंगच्या साह्याने आम्ही ५० शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवत आहोत."

Pune Ganeshotsav
Maharashtra Politics : शिंदेंचा नेता आणि माजी आमदाराला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com