Pune Fire News Update : पुण्यात लक्ष्मी पूजनच्या दिवशी फटाक्यांमुळे तब्बल ३१ आगीच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाने वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. अथवा मोठं नुकसान झाले नाही. मांजरी, बालेवाडी, कोथरुड, लक्ष्मी रोड, कात्रज यासारख्या गर्दीच्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाला आगाडीच्या घटना घडल्या.
पुणे शहरात शुक्रवारी सायंकाळी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे विविध भागात ३१ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी सात ते रात्री १२ या कालावधीत शहरात ३१ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. या भागातील अग्निशमन दलाच्या केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. यापैकी काही घटनांमध्ये नुकसान झाले. सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
राञी ७ ते ९ यावेळेत लक्ष्मीपुजन फटाक्यांमुळे आगीच्या घटना
१) राञी ०७•३५ - कळस येथे रस्यावर कचरा पेटला (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)
२) ०७•३६ - मांजरी, मोरे वस्ती येथे ऊसाच्या शेतामध्ये आग (हडपसर अग्निशमन केंद्र, एक वॉटर टँकर)
३) ०८•०५ - बालेवाडी फाटा, काका हलवाई स्वीट समोर वायर पेटली (पाषाण अग्निशमन केंद्र वाहन)
४) ०८•०६ - कोथरुड, रामबाग कॉलनी येथे झाडाला आग (कोथरुड अग्निशमन केंद्र वाहन)
५) ०८•१२ - मार्केटयार्ड, गेट क्रमांक पाचजवळ कचरयाच्या वाहनामधील कचरा पेटल्याने आग (गंगाधाम अग्निशमन केंद्र वाहन)
६) ०८•१९ - सहकारनगर पोलिस चौकीजवळ नारळाच्या झाडाला आग (जनता अग्निशमन केंद्र वाहन)
७) ०८•२२ - मंगलदास रस्ता येथे झाडाला आग (नायडू अग्निशमन केंद्र वाहन)
८) ०८•२४ - गणेश पेठ, बुरुड आळी येथे ताडपञी पेटल्याने आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
९) ०८•३० - काञज, संतोषनगर येथे इमारतीच्या गॅलरीमध्ये आग (काञज अग्निशमन केंद्र वाहन)
१०) ०८•३४ - रविवार पेठ, तांबोळी मस्जिद नजीक कपड्याच्या दुकानात आग (कसबा अग्निशमन केंद्र वाहन)
११) ०८•३८ - बी टी कवडे रस्ता, भारत फोर्ज कंपनी समोर एका ट्रकला आग (बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र वाहन)
१२) ०८•४० - लक्ष्मी रोड, विजय टॉकीज जवळ घरामध्ये आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
१३) ०८•४५ - कळस स्मशानभूमी जवळ एका शेतामध्ये आग (धानोरी अग्निशमन केंद्र वाहन)
१४) ०८•५४ - टिळक रस्ता, महाराष्ट्र मंडळ शेजारी झाडाला आग (मध्यवर्ती अग्निशमन केंद्र वाहन)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.