Pipari- Chinchwad Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: पिंपरीमध्ये अपघाताचा थरार! भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं, जागीच मृत्यू

Pipari- Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं. या अपघातामध्ये सफाई कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाला पोलिसांनी अटक केली.

Priya More

Summary -

  • वाकड परिसरात भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • मुकेश रणपिसे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कायमस्वरूपी सफाई कर्मचारी होते.

  • कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गोपाळ मोटघरे, पिंपरी- चिंचवड

पिंपरी- चिंचवडमध्ये अपघाताची भयंकर घटना घडली. भरधाव कारने सफाई कर्मचाऱ्याला चिरडलं. या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेदरकारपणे कार चालवणाऱ्या चालकाने सफाई कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या जागीच मृत्यू झाला. पिंपरी -चिंचवड शहरातील वाकड परिसरातील एम्पायर गार्डनसमोर हा अपघात झाला. आज सकाळी साडेआठ वाजता दरम्यान ही घटना घडली. मुकेश कोंडीराम रणपिसे असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मुकेश रणपिसे हा पिंपरी- चिंचवड महापालिकेत कायमस्वरुपी सफाई कामगार म्हणून घंटागाडीवर कार्यरत होता. या प्रकरणात वाकड पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. या कार चालकाविरोधा वाकड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.पोलिस सध्या तपास करत आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे का हे देखील तपासले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा चलो दिल्लीचा नारा, देशभरातील मराठ्यांना साद घालणार

Maharashtra Live News Update: रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरीलल हातखंबा गावात भीषण अपघात

Maratha-Kunbi caste certificate: मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Express Engine Fire : एक्स्प्रेसच्या इंजिनला अचानक आग; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकरण; स्मृतीस्थळावर फॉरेन्सिक टीम दाखल|VIDEO

SCROLL FOR NEXT