CCTV Video : वेगात कार आली अन् दुकानाला धडकली, ३ जणांचा जागीच मृत्यू, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

accident CCTV footage viral : एका वेगवान कारने दुकानासमोर उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
Car Accident in Pratapgarh Leaves 3 Dead
Car Accident in Pratapgarh Leaves 3 Dead
Published On
Summary
  • प्रतापगडच्या मानिकपूरमध्ये भीषण अपघात झाला.

  • वेगवान कारने दुकानासमोर उभ्या लोकांना चिरडले.

  • ३ जणांचा मृत्यू, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

  • घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Car Accident in Pratapgarh Leaves 3 Dead : उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात एक भयंकर अपघात झाला आहे. एका वेगवान कारचे नियंत्रण सुटल्याने दुकानासमोर उभ्या असलेल्या अनेक लोकांना चिरडले. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रयागराज-लखनौ मार्गावरील मानिकपूर येथे ही घटना घडली.

रस्त्याच्या बाजूला एका दुकानाजवळ काही लोक उभे होते. त्यावेळी अचानक एक कार वेगात आली अन् चिरडले. या घटनेत मधु प्रकाश सोनकर, अरविंद, शिल्पा यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजतेय. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला. पोलिसाचा पुढील तपास सुरू आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हायरल झालेय.

Car Accident in Pratapgarh Leaves 3 Dead
PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्प यांचा फोन, नेमकी काय झाली चर्चा?

अपघातामधील जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेकाजण हैराण झाले. स्थानिकांचे म्हणणे आहे की, या मार्गावर वेगवान वाहने सातत्याने अपघातांना कारणीभूत ठरतात. पण प्रशासनाने यावर ठोस पावले उचललेली नाहीत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मानिकपूर पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. स्थानिकांनी सांगितले की, अनेक लोक दुकानावर उभे होते, तेव्हा एक निळ्या रंगाची कार आली आणि अनेकांना चिरडले. यामुळे दुकानासमोर उभ्या असलेल्या तिघांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. कारचा वेग खूप जास्त होता, ज्यामुळे दुकानाबाहेरील ताडपत्रीही उडाली.

Car Accident in Pratapgarh Leaves 3 Dead
Good news for Mumbaikars! मुंबईत आजपासून धावणार ई-बाईक , तिकिट फक्त 15 रुपये, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com