Pimpri Chinchwad Police
Pimpri Chinchwad PoliceSaam tv

Pimpri Chinchwad : दुचाकी, रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पिंपरी चिंचवड पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

Pimpri Chinchwad Police : पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. मेट्रो स्टेशन तसेच गर्दीच्या परिसरातील दुचाकी वाहन चोरण्यासाठी आपले लक्ष करीत होते असं पोलीस तपासात उघडकीस आला
Published on

पिंपरी चिंचवड : शहरात मोटारसायकल व रिक्षा चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल १८ मोटरसायकल आणि २ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. 

पिंपरी चिंचवड शहर आणि ठाणे शहरात मोटरसायकल तसेच ऑटो रिक्षा चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत पोलिसात तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारीनंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु असताना दुचाकी व रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या टोळीत आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 

Pimpri Chinchwad Police
Akot Heavy Rain : बळीराजावर संकट! अकोल्याच्या पुंडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

चार जणांना घेतले ताब्यात 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टोळीकडून जवळपास सात लाख २४ हजार ९००  रुपये किमतीचे १८ मोटरसायकल आणि २ ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत. मुबिन नूर मोहम्मद शेख (वय २५), फईज फिरोज शेख (वय २२), अमन प्रेमचंद शुक्ला (वय १९) आणि सुनील शांताराम मोरे (वय ३०) अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. आरोपी हे मेट्रो स्टेशन तसेच गर्दीच्या परिसरातील दुचाकी वाहन चोरण्यासाठी आपले लक्ष करीत होते असं पोलीस तपासात उघडकीस आला आहे.

Pimpri Chinchwad Police
Akkalkuwa News : जीवघेणा प्रवास थांबता थांबेना; प्रसूतीसाठी झोळीत टाकून ७ किलोमीटर पायपीट

५० जण १३ दिवसांसाठी तडीपार 

गणेशोत्सव दरम्यान ५० कुख्यात गुंडाना १३ दिवसासाठी तडीपार करण्याची कारवाई नागपूर पोलिसांनी केली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये; यासाठी ५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. यामध्ये नागपूर पोलीस झोनच्या क्रमांक २ आणि क्रमांक दोन सहाच्या एकूण ६ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com