Horrific Accident : विमानतळ रोडजवळ भीषण अपघात, भरधाव ट्रकने डझनभर लोकांना चिरडलं, दोघांचा मृत्यू

MP Horrific Accident update : मध्य प्रदेशातील विमानतळ रोडजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
horrific accident
MP Horrific Accident updateSaam tv
Published On
Summary

इंदूर विमानतळ रोडजवळ भागात भीषण ट्रक अपघात

अपघातात दोघांचा मृत्यू, १०-१५ जण गंभीर जखमी

अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केलं

मध्य प्रदेशच्या इंदूरच्या विमानतळ रोडजवळील शिक्षक नगरमध्ये सोमवारी सांयकाळी भीषण अपघात झाला. अंकित हॉटेल ते गीतांजली रुग्णालयापर्यंत भरधाव ट्रकने १० ते १५ जणांना चिरडलं. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर इतर लोक गंभीर जखमी आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रकखाली एक बाईक अडकली. ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीला आग लागली. पुढे ट्रकलाही आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवलं. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

horrific accident
SIR : काही गडबड आढळली तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू; 'एसआयआर'बाबत सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

पोलिसांनी सध्या घटनास्थळावर नियंत्रण मिळवलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

horrific accident
Nashik Crime : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

प्राथमिक माहितीनुसार,चालकाने भरधाव ट्रकवरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर रुग्णालयाजवळील इ-रिक्षासहित अनेक वाहनांना धडक दिली. एक तरुण ट्रकच्या पुढच्या भागात अकडला. या ट्रकला लागलेल्या आगीत हा तरुण होरपळला. उपस्थितांनी त्यांना तातडीने आगीतून बाहेर काढलं.

अपघातानंतर भीतीचं वातावरण

अपघातानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. या अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेतील हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली.

horrific accident
Sharad Pawar : 'देवाभाऊ' नेपाळमध्ये काय झालं बघा; शरद पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्नांवरून सरकारवर ओढले आसूड

अपघातानंतर इंदूर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरु केली आहे. तसेच अपघातस्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. ज्या रुग्णालयाजवळ भीषण अपघात झाला, त्या ठिकाणाची गर्दीचं व्यवस्थापन सुधारण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com